आपल्या सर्वाच्या परिचयाचा अत्यंत उपयोगी असा बांबू. समशीतोष्ण आणि उष्ण हवामान बांबूला मानवते, भारतातील काश्मीर सोडून इतर सर्व राज्यांत मदानी आणि डोंगराळ भागात बांबू होतो. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन बांबूसाठी आवश्यक असते.

बांबू हा तृण कुळातील पोअ‍ॅसी (ग्रामिनी) कुटुंबातील आहे. बांबू वृक्षाप्रमाणे उंच वाढतो. त्याचे जीवनचक्र अनेक वर्षांचे असते. खोड टणक आणि सकाष्ट आहे. त्याला कांडे, पेरे, असून पेरावर डोळे असतात.

water tank cooling tips
Jugaad Video: उन्हाळ्यात नळातून पाणी गरम येतंय? ‘हा’ सोपा जुगाड करुन पाहा; कडक उन्हात टाकीतील पाणी राहील थंड
coconut oil and aloe vera for beautiful and glowing skin Benefits
उन्हाळ्यात चेहरा कायम चिपचिपा, घामट दिसतो? खोबऱ्याचं तेल अन् कोरफडीचं मिश्रण वाढवेल सौंदर्य
Summer Special Sabudana Batata Recipe
फक्त १ वाटी साबुदाणा-१ बटाटा आणि तोंडात घालताच विरघळणारे उपासाचे पापड, १५ मिनिटतात ५० पापडाची सोपी कृती
Draw a beautiful rangoli of Gudhi
Video : पळी वापरून काढा गुढीची सुंदर रांगोळी, पाहताक्षणी लोक म्हणतील, “वाह! सुरेख”

बांबूला सोटमूळ नसते. बुंधा जमिनीत खोलवर न जाता जमिनीला समांतर जातो. रांगते खोड पसरून पेरांवरील नवीन कोंब बाहेर येतात. या कोंबातूनच बांबूची उत्पत्ती होते. कोंब जमिनीबाहेर येऊन सरळ आणि उंच वाढतात फांद्या १० -४० सेमी लांब असतात. पानांत विविधता असते. फुले अतिशय लहान आणि झुबक्यात येतात. फुलांमध्ये बीजधारणा झाली की बांबू मरतो. हा काळ बांबूच्या बाबतीत साधारण ३५ ते ६० वर्षांचा असतो. जातीनुसार कमी-जास्त होतो. जातीनुसार बांबूचे रंग आणि जाडीत फरक पडतो. भारतात साधारणपणे बांबूच्या २२ जाती आणि १०० ते १२० प्रजाती आहेत. त्यापकी ५०%  बांबू हा पूर्व भारतात होतो.

बांबूची मुळे जमिनीला घट्ट धरून ठेवतात. जमिनीतील सेंद्रियता आणि भुसभुशीतपणा वाढवण्यास बांबूची मदत होते.

बांबूची वजन पेलण्याची क्षमता उत्तम असते, त्यामुळे त्याचा अनेक वर्षांपासून घरबांधणी, नौकाबांधणी, छायागृह, अशा विविध कारणांसाठी उपयोग होतो. आजकाल हरितगृहाचा सांगाडा करण्यासाठीही बांबू वापरतात. बांबू आतून पोकळ असल्याने त्याच्या सरळ फळ्या कापता येत नाहीत. बांबूच्या अरुंद आणि पातळ पट्टय़ा कापतात. या पट्टय़ा कापून त्या शिजवतात. शिजवताना त्यातील स्टार्च काढून टाकला जातो. या पट्टय़ा वाळवतात, त्यांना सरसासारखा चिकट पदार्थ लावून गठ्ठे करतात. गठ्ठे रांधून लहान फळ्या किंवा प्लाय बोर्ड करतात. बांबूचा उपयोग हा कागदनिर्मितीसाठी प्रामुख्याने होतो. बांबूचे कोवळे कोंब खातात. भाजी करतात. बांबूपासून औषधेही बनवितात. बांबूतील औषधी द्रव्याचा उपयोग कफ, पित्त या दोषांवर होतो. बांबूचे पेर, पाने, अंकुर, फुले सर्व औषधी आहेत.

अनिता कुलकर्णी (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

 office@mavipamumbai.org

 

आजचे मॉस्को

मॉस्को शहर इ.स. ११४० मध्ये वसवले गेले. तेराव्या शतकात झार इव्हानने मॉस्कोत प्रथम आपली राजधानी केली. मॉस्को शहराची लोकसंख्या एकोणिसाव्या शतकात अडीच लाखांवरून दहा लाखांवर गेली, तर विसाव्या शतकात दहा लाखांवरून उपनगरीय वस्तीसह दीड कोटींहून अधिक झाली. सध्या मॉस्को शहराचा विस्तार २५०० चौ.कि.मी. क्षेत्रावर आहे. सेंट पीटर्सबर्ग येथील राजधानी रशियन राज्यप्रदेशाच्या सीमेलगत असल्यामुळे परकीय आक्रमणांचा धोका ओळखून तत्कालीन राजकीय सूत्रधार लेनीन याने १९१८ साली मॉस्कोत हलवली. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीची विजयी घोडदौड मॉस्कोच्या वेशीपाशी थांबवून तिला माघारी पिटाळण्याचे श्रेय मॉस्कोला जाते. या विजयदिनाचा विसावा वर्धापन दिन १९६५ साली साजरा झाला. या समारंभात मॉस्कोला ‘हिरो सिटी’चा खिताब देण्यात आला. १९२२ ते १९९१ या काळात रशियात सोव्हिएत कम्युनिस्ट सरकार सत्तेवर होते. या काळात या सरकारने मॉस्कोत दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या तीव्र गृहटंचाईमुळे १३००० ठिकाणी मोठे गृहनिर्माण प्रकल्प राबवून तोडगा काढण्यात ते यशस्वी झाले. १९३५ साली मॉस्को मेट्रो सुरू झाली. सोव्हिएत प्रमुख स्टालिन याच्या प्रेरणेने लाझार काग्नोव्हीच या अभियंत्याने आराखडा आणि रचना केलेली पहिली तेरा भूमिगत मेट्रो स्टेशन्स त्यांच्या कलाकुसरीमुळे आजही जगात अद्वितीय आहेत. सध्या मॉस्को ही रशियाची प्रमुख राजकीय, औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी आहेच पण त्याशिवाय रशियन आर्थोडॉक्स चर्च या ख्रिश्चन पंथाचे प्रमुख धर्मपीठही आहे. सध्या मॉस्कोत ८५ टक्के आर्थोडॉक्स ख्रिश्चन, पाच टक्के इस्लामधर्मीय, पाच टक्के कॅथलिक, दोन टक्के प्रोटेस्टंट, तर प्रत्येकी एक टक्का बौद्ध ,ज्यू आणि इतर धर्मीय असे प्रमाण आहे. साक्षरतेचे प्रमाण ९९.७ टक्के असलेल्या मॉस्कोत लोमोनोसोव्ह मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी ही १७५५ साली स्थापन झालेली प्रमुख शिक्षणसंस्था आहे. फेडरल सिटी मॉस्को नगर प्रशासनाला काही विशेष अधिकार दिलेले आहेत. प्रशासकीय व्यवस्थेसाठी मॉस्कोचे बारा ‘ओकगर्स’मध्ये विभाजन करून त्यातून मॉस्को सिटी डय़ुमा या प्रशासकीय मुख्यालयासाठी ३५ सदस्य मंडळाची निवड होते. तसेच बारा सदस्यांची कार्यकारिणी आणि एक सिटी मेयरची निवड होते.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com