देशा-देशांतील नागरिकांच्या जीवनमानातील तफावत लक्षात घेता, आता एकूण मानव समाज विकासाच्या कुठल्या पायरीवर आहे; हे जाणून घेणे गरजेचे वाटू लागले.  संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (यूएनडीपी) या विभागाने १९९० मध्ये ‘मानव विकास निर्देशांक’ निर्माण करण्याचा एक प्रकल्प हाती घेतला. मानवी विकास केवळ राष्ट्रीय उत्पन्नावरून न मोजता त्याला लोक-केंद्रित केले जावे, ही यामागची भूमिका होती.

नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी मेहबूब-उल- हक व अन्य तज्ज्ञांसोबत ‘मानव विकास निर्देशांक’ बाबतच्या संकल्पना-बांधणीत मोलाचे योगदान दिले. त्या निर्देशांकाचीउपयुक्तता पटल्याने तेव्हापासून दरवर्षी तो निर्माण करण्यात येत आहे.

All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
What is Microsoft warning to India about China regarding AI
‘एआय’च्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गोंधळ उडवणे शक्य? चीनबाबत मायक्रोसॉफ्टचा भारताला कोणता इशारा?
changes in temperature and inflation marathi news, temperature change impact on inflation marathi news
विश्लेषण : उष्णतेच्या झळांमुळे अन्नधान्य महागाई? नवीन संशोधनामध्ये कोणते गंभीर इशारे?
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण

हल्ली मानव विकासाचे मोजमाप करताना, दीर्घ व स्वस्थ आयुष्य, अध्ययन/ ज्ञान ग्रहण,आणि चांगले राहणीमान अशा तीन मिती विचारात घेतल्या जातात. त्याप्रमाणे प्रत्येक देशातील सामाजिक आणि आíथक विकासाची पातळी पुढील चार घटकांवर मोजली जाते.

(१) जन्माच्यावेळी अपेक्षित आयुष्यमान,

(२) शाळेत काढलेली सरासरी वष्रे (२५वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या व्यक्तीने शाळेत काढलेली वष्रे),

(३) शाळेत व्यतीत  करण्याची अपेक्षित वष्रे (पाच वर्षांचे मूल असेल तर त्याच्या आयुष्यात शिक्षणासाठी किती वष्रे खर्च होतील?),

(४) दरडोई एकूण राष्ट्रीय उत्पन.

याबाबत आकडेवारी मिळवून गणिती पद्धतीनी एक मानव विकास निर्देशांक संकलित केला जातो.

मानव विकास निर्देशांक ० ते १ यामधीलसंख्येत प्रत्येक देशासाठी दर्शवला जातो. एकूण जगाचा सरासरी तसेच भारताचा मानव विकास निर्देशांक पुढीलप्रमाणे वाढत गेला आहे, जो एक चांगला कल दाखवतो.

वर्ष     जग    भारत

१९९०   ०५९७   ०४२८

२०००   ०.६४१  ०.४९४

२०१०   ०.६९६  ०.५८०

२०१५   ०.७१७  ०.६२४

भारताच्या मानव विकास निर्देशांकाची वाढ मध्यम गतीने होत आलेली आहे. या निर्देशांकाप्रमाणे १८८ देशांच्या उतरत्या यादीत २०१६  साली तो १३१ व्या क्रमांकावर होता. पहिल्या १००  देशांत भारत गणला जावा व त्याचा हा निर्देशांक जागतिक निर्देशांकाच्या सरासरीच्या पुढे असावा, असे लक्ष्य ठेवायला हवे.  त्यासोबत देशाच्या विविध भौगोलिक क्षेत्रांतील या निर्देशांकाची तफावत कमी करण्यावरही भर दिला जावा. ( मात्र  सामाजिक प्रगती निर्देशांकाप्रमाणे १३३ देशांच्या उतरत्या यादीत भारताचा क्रमांक२०१५  साली १०१ वा तर  २०१६  साली ९८ वा होता. हा निर्देशांक अमेरिकेतील वॉिशग्टनमधील एक स्वयंसेवी संस्था दरवर्षी प्रकाशित करते. )

डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

कवीचं स्थान, दृक्  -श्राव्य युगाचं भान!

१९९०चा ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. व्ही. के. गोकाक यांनी केलेल्या भाषणात साहित्यिकाची विचारधारा, व त्याची भूमिका विशद केली आहे.

ते म्हणतात- ‘ मी २१व्या शतकातील नागरिक म्हणून कवीच्या वर्चस्वासंबंधी बोलणार आहे. २०व्या शतकाची काळगंगा आपल्या विभिन्न जलधारांना बरोबर घेऊन या कालौघात विलीन होण्यासाठी चालली आहे. २१ व्या शताब्दीच्या विक्षुब्ध तरंगांचा सामना या जलधारा कसा काय करू शकतील, याबद्दल माझ्या मनात शंका आहे. या परिवर्तनाला आमचा कवी ओलांडून जाऊ शकेल? .. बटन दाबल्यावर बोलू शकणाऱ्या आजच्या युगात किंवा उद्याच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या युगात कवीचं अस्तित्वच नाकारलं जाण्याची शक्यता आहे. मनुष्य कॉम्प्युटर, रोबोट वा यंत्राची निर्मिती होऊन जाईल हे विधान हादरवणारे आहे.  .. मी १९५९  मध्ये लिहिलेल्या एका कवितेत म्हटलं होतं :

‘कधी तरी आम्ही-

लोखंडी फुफ्फुसांनी श्वास तर

घेऊ शकणार नाही ना?

रोबोटच्या हातून जेवण जेवू लागणार नाही ना?

इलेक्ट्रॉनिक्सच्या मस्तकाने विचार

करू लागणार नाही ना?

कधी तरी आम्ही-

अणूचं विभाजन करून,

मानवतेचं तर विभाजन करणार नाही ना?

आजचं जग पहिलं असो किंवा तिसरं. या जगात कवी, नाटककार, कादंबरीकारवा चित्रपट लेखक यांची आवश्यकता आहे. कारण तोच या जगातील लोकांचा मित्र, मार्गदर्शक बनून त्यांना असत्पासून मुक्त करून सत् क्षेत्रात पोहोचवणार आहे.

आधुनिक भारतीय कवी प्राचीन, अर्वाचीन युगांतून आधुनिक जगात प्रवेश करता करता खूप बदलला आहे. महाकाव्य तसेच गीतिकाव्याचा प्रयोगही तो संशोधित रूपात करतो आहे. भाषा बदलली आहे. येणाऱ्या शताब्दीत काव्यातील बौद्धिक तत्त्व हळूहळू कमी होत जाईल. कमी शब्दांत अधिक सांगणं हे कवितेचं लक्षण बनू शकतं. साहित्याच्या चिंतनपर प्रक्रियेला नयन /श्रवण या दोन्हीशी संबंधित कलेचं रूप दिलं जाऊ शकतं. हेच या युगाचं सार आहे.

मानवतेच्या विकासाच्या कोणत्याही टप्प्यात कवी जो उद्देश घेऊन जन्म घेतो, तो उद्देश कवी पूर्ण करतोय. जसं वैज्ञानिक, तत्त्वज्ञ, योगी करतात. कवितेचं बाहय़रूप बदलू शकतं, पण कवितेच्या आत्म्याची विद्युत-चुंबकीयता सहस्राब्दीपर्यंत अजस्र राहील.’

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com