पृथ्वीवर   प्राणी, वनस्पतींच्या अंदाजे १.५ ते २ दशलक्ष प्रजाती अस्तित्वात आहेत, रॉयल बॉटॅनिकल गार्डनच्या अगदी अलीकडच्या आकडेवारीनुसार जगातील वनस्पती प्रजातींची संख्या आहे ३९,०९,००० अन या वनस्पतींतील ३,५९,४०० वनस्पती प्रजाती सपुष्प आहेत.

औषधी वनस्पती तसेच लोप पावत चाललेल्या वनस्पतींचे अचूक निदान करणे गरजेचे असते. पण अशा वनस्पतींचे अचूक निदान न झाल्यामुळे अनेक समस्याही निर्माण होतात. या समस्यांवर मात करीत वनस्पतीचे अचूक निदान करण्याची पद्धत अलीकडेच विकसित झाली आहे. अन् ती पद्धत म्हणजे ‘डीएनए बारकोड पद्धत’. शॉिपग मॉलमध्ये प्रत्येक वस्तूवर लावलेल्या आडव्या रेघांच्या बारकोडवरून जशी वस्तूची अचूक किंमत तसेच इतर माहिती आपल्याला कळते. त्याच धर्तीवर वनस्पतींचे निदान करण्यासाठी वनस्पतींच्या पेशीतील डीएनए रेणूचा वापर करून त्याद्वारे वनस्पतीची अचूक ओळख पटवली जाते. ‘आय कार्ड’प्रमाणे त्यासाठी वनस्पती पेशीतील डीएनए. रेणूच्या विशिष्ट भागाचा वापर वनस्पतीची ओळख पटवण्यासाठी करण्यात येतो. जॉन क्रेस या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम वनस्पतींमध्ये ‘डीएनए बारकोड पद्धत’ विकसित केली. वनस्पती पेशीतील तंतुकणिकेतील (मायटोकॉण्ड्रिया) डीएनए रेणूतील सायटोक्रोम सी आक्सिडेज १ सीओआय (COI)  हे जनुक प्रत्येक सजीवात विशेष स्वरूपात आढळून येते. व त्या जनुकावरून त्या प्रजातीची अचूक ओळख पटविणे शक्य होते. वनस्पतीतील बारकोडिंगसाठी वनस्पती पेशीतील हरितलवकातील आरबीसीएल (RBCL) व एमएटीके   (MATK)  या वैशिष्टय़पूर्ण जनुकाचा वापर केला जातो. ही जनुके सजीवांच्या ‘बारकोड’प्रमाणे कार्य करतात व या जनुकांवरून त्या प्रजातीची ओळख पटविणे शक्य होते. या पद्धतीमध्ये वनस्पतीच्या कुठल्याही भागात असणाऱ्या पेशींमधील हरितलवकातील डीएनए रेणू विभक्त केला जातो. व या रेणूतील आरबीसीएल व एमएटीके या जनुकांची पीसीआर रेणवीय तंत्राद्वारे तपासणी करून त्याद्वारे विशिष्ट जनुकांचा उभ्या रेषांच्या स्वरूपात तयार झालेल्या आराखडय़ावरून वनस्पती प्रजातीची अचूक ओळख पटवली जाते. त्यातून तयार होतो वनस्पतीचा ‘बारकोड’.

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

डॉ. सिद्धिविनायक बर्वे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org

 

ताश्कंद, समरकंद, दिल्ली..

िहदुस्थानातील मध्ययुगीन राजकीय साम्राज्यांपकी एक असलेल्या मुघल साम्राज्याचा संस्थापक अशी ओळख आहे झहीर-उद-दीन मोहम्मद बाबर याची. बाबराचा जन्म मध्ययुगातील ताश्कंदच्या आधिपत्याखाली असलेल्या प्रदेशातील आंदिजान शहरातला, इ.स.१४८३ चा. वडील फरगाना या प्रांताचे शासक होते. बाबराचे पूर्वज मूळचे मंगोल वंशाचे होते. फारसीमध्ये मंगोलला, ‘मुघल’ हा शब्द असल्यामुळे पुढे िहदुस्थानात बाबराच्या वारसांना मुघल किंवा मोगल हे उपनाम रूढ झाले. बाबरची आई, मंगोलसम्राट चेंगिज खान याच्या वंशातील चौदावी वारस होती. वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या बाराव्या वर्षी फरगान्याच्या गादीवर बसलेल्या बाबराने प्रथम शेजारचे समरकंदचे राज्य घेतले. पुढे त्याचे राज्य त्याच्या चुलत्याने बळकावल्यावर बाबराने बर्फाच्छादित असा िहदुकुश पर्वत, सन्यासह ओलांडून १५०४ साली काबूलवर आपले नियंत्रण बसवले. काबूलनंतर त्याने आपला मोर्चा उत्तर िहदुस्थानाकडे वळवला.

त्या काळी दिल्ली आणि गंगेच्या खोऱ्यातील प्रदेशात अफगाण लोदी घराण्याच्या इब्राहिम लोदीचा अंमल होता आणि राजपुतान्यावर मेवाडच्या राणा संग याचे राज्य होते. बाबरने प्रथम पंजाबवर कब्जा करून इब्राहिम लोदीशी सामना करण्यासाठी दिल्लीकडे कूच केले. २० एप्रिल १५२६  रोजी बाबराच्या सन्याची, लोदीच्या एक लाख सनिक आणि शंभर हत्तींची परिपूर्ण असलेल्या फौजेशी पानिपत येथे गाठ पडली. लोदीच्या सन्यावर विशेषत: हत्तींवर तोफांचा मारा करून बाबराने हत्तींना घाबरवून सोडले आणि उडालेल्या गोंधळाचा फायदा उठवीत लोदीच्या सन्याची दाणादाण उडवली. या विजयानंतर बाबराने दिल्लीवर आपली मुघल सत्ता प्रस्थापित केली. पानिपतपाठोपाठ १५२७ मध्ये खानबा येथे झालेल्या युद्धात बाबराने राणा संगावर विजय मिळवून मुघल राज्याचा विस्तारही केला. अशा प्रकारे, १५२८ साली स्थापन केलेले ‘मुघल साम्राज्य’मधली पंधरा वष्रे वगळता १८५७ च्या बहादुरशहा जफपर्यंत म्हणजे ३१६ वष्रे टिकले. चगताई ही बाबराची मातृभाषा. या भाषेत त्याने ‘बाबरनामा’ हे आत्मचरित्र लिहिले. १५३० साली आजारपणाने, बाबराचे वयाच्या ४७ व्या वर्षी निधन झाले.

शहरे वसविणे, बागबगीचे तयार करणे याबद्दलही बाबराने आत्मचरित्रात लिहिले आहे.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com