पुण्यातील बुधवार पेठेत मंगळवारी रात्री प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने वार करून हत्या केल्याची घटना  घडली. रात्री पावणे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला असून या घटनेचा अधिक तपास फरासखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी करित आहे.

बुधवार पेठेतील बिनी मुल्ला या महिलेकडे सुखदेव रामदास मडावी हा नेहमी जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांमध्ये मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात आरोपी सुखदेव मडावी याने बिनी मुल्लाच्या गळ्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात बिनी मुल्ला गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून फरासखाना पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.