प्रकाशोत्सवासाठी ‘महावितरण’चे कर्मचारी कार्यरत

दिवाळी म्हणजे आनंदोत्सवासह प्रकाशाचा अन् दिव्यांनी आसमंत उजळून टाकण्याचा सण. आधुनिक काळात रंगीबेरंगी आकाशकंदील, विजेच्या दिव्यांनी दिवाळीला प्रसन्नता देतात. ही प्रसन्नता कायम ठेवण्यासाठी आणि दिवाळीला खऱ्या अर्थाने प्रकाशमान ठेवण्यासाठी महावितरणचे कर्मचारी ऐन दिवाळीच्या दिवसांतही कर्तव्यावर आहेत. इतर नागरिक दिवाळी साजरी करीत असताना वीजयंत्रणेत कुठेही आणि केव्हाही बिघाड झाल्यास किंवा काही अडचणी निर्माण झाल्यास जनमित्र ते अभियंते प्रकाशदूताप्रमाणे तत्पर आहेत.

Maha Metro, Nagpur, decrease, Metro fare, 33 percent, March 1 2024,
नागपूरकरांसाठी गुड न्यूज, मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल
unique information, exhibition hall, State Excise Department
१८३९ नंतर मद्यपान करण्यासाठी १८ वर्षे वयोमर्यादा जगभरात लागू! नव्या राज्य उत्पादन शुल्क भवनातील खास दालनातील माहिती
Aadhaar and thumb impression will disappear while searching for property online
प्रॉपर्टीचा ऑनलाइन शोध घेताना आधार, थंब इम्प्रेशन होणार गायब

घरातील विजेच्या एका बटनामागे अजस्र यंत्रणा आणि हजारो कर्मचाऱ्यांचे जाळे असते. काही अडचणींमुळे वीज गेल्यास जवळपास सर्वच कामे ठप्प होतात. त्यामुळे नागरिकांची चिडचड होते. काही वेळेला वीज कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त केला जातो. इतर कोणत्याही वेळेला हा संताप तीव्रच असतो. त्यात ऐन दिवाळीतच वीज गायब झाल्यास काय होईल, याची कल्पना करता येणार नाही. त्यामुळेच भल्यामोठय़ा वीजयंत्रणेवर सणाच्या काळामध्ये डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित असते.

दिवाळीत सार्वजनिक सुटी असली, तरी महावितरणच्या शाखा कार्यालयातील जनमित्र, अभियंते आणि वीज उपकेंद्रांतील यंत्रचालक त्यांच्या वेळेनुसार कर्तव्यावर हजर आहेत.  दिवाळीच्या संपूर्ण दिवसांमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे कर्तव्य ते बजावीत आहेत. दिवाळीत फटाक्यांमुळे आग लागून, शॉर्टसर्कीट होऊन वीज जाण्याच्या घटना होतात. त्यावेळी कोणत्याही वेळेला जनमित्रांना पोहोचावे लागते. समस्या गंभीर असल्यास इतर सर्व कामे सोडून अभियंत्यांनाही संबंधित ठिकाणी पोहोचावे लागते. त्यामुळे नागरिकांची दिवाळी सुखकर करण्यातच आमची दिवाळी असल्याची भावना कर्मचारी बोलून दाखवितात.

पावसाच्या तडाख्यानंतर दिवाळीची जबाबदारी

मागील आठवडय़ामध्ये परतीचा पाऊस जोरदार बरसला. त्यामुळे काही ठिकाणी विजेचे खांब कोसळण्याचे, तर काही ठिकाणी वीजवाहिन्यांवर झाडे पडण्याच्या घटना घडल्या. फिडर पिलरमध्ये पाणी गेल्याने, तसेच भूमिगत वीजवाहिनीत बिघाड झाल्यानेही वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्री भर पावसात दुरस्तीची कामे केली. पावसाच्या तडाख्यात सातत्यावने कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्यानंतर लगेचच दिवाळीत वीज सुरळीत ठेवण्याची जबाबदारी आली आहे.

दिवाळी प्रकाशाचा सण असल्याने चोवीस तास वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी महावितरणचे कर्मचारी सज्ज आहेत. वीज यंत्रणेवर काम करणारे जनमित्र, अभियंता हे खऱ्या अर्थाने प्रकाशदूत आहेत. विजेच्या एका बटनामागे भलीमोठी यंत्रणा असते. त्यामुळेच इतर नागरिक दिवाळी साजरी करत असताना त्यांची दिवाळी प्रकाशमान ठेवण्यासाठी महावितरणचे कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत.

निशिकांत राऊत, महावितरण, जनसंपर्क अधिकारी