पुण्यात प्रमुख राजकीय पक्षांकडून निवडणूक लढवत असलेल्या पन्नासहून अधिक उमदेवारांपेक्षाही गेले दोन दिवस चर्चा आहे ती अंकुश काकडे यांची. काकडे यांचा उमेदवारी अर्ज कसा बाद झाला हाच चर्चेचा विषय बनला आहे. अर्ज बाद होऊनही काकडेअण्णा अनेक कारणांनी चर्चेत राहिले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा माणूस, अजितदादांशी जवळीक आणि अन्य पक्षांतील अनेक नेत्यांचा जवळचा मित्र अशी ओळख असलेले काकडे हे राजकारणातले चांगले मुरब्बी नेते. महापालिकेच्या आणि विधानसभेच्याही अनेक निवडणुका लढवण्याचा अण्णांचा दांडगा अनुभव. ते पुण्याचे महापौरही होते. अशा अनुभवी नेत्याचा निवडणूक अर्ज शपथपत्र जोडलं नव्हतं म्हणून बाद होऊ शकतो, यावर शाळकरी मुलाचाही विश्वास बसलेला नाही.
शपथपत्र टाईप करण्यासाठी जिथे गेलो तेथील वीज गेली होती. त्यामुळे ते वेळेत जोडता आलं नाही.. वगैरे कारणं काकडे यांनी सांगितली आणि त्यांच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी जी चर्चा सोडून दिली ती ऐकून तेही आता मनातल्या मनात हसत असतील. एकुणातच उमेदवारी अर्जाबरोबर शपथपत्र जोडायला अण्णा विसरले हे काही कोणाला पटलेलं नाही. त्यामुळे आता चर्चा दुसऱ्याही अंगानंही सुरू झाली आहे. काकडे कसब्यातून लढायला राजी नव्हते, तरीही त्यांनीच कसब्यातून निवडणूक लढवावी एवढं आग्रही खरोखरच कोण होतं? हा कोण एवढा प्रभावशाली नेता आहे की त्यानं काकडे यांनाच उमेदवारी दिली? हा आग्रह पक्षातल्याच कोणाचा होता का अन्य कोणाचा होता?
एकीकडे पक्षाकडून काकडे यांना ए बी फॉर्म देण्यात आला आणि काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेल्या दीपक मानकर यांनाही ए बी फॉर्म देण्यात आला. म्हणजे काकडे यांच्यासाठी कोणीतरी आग्रही होतं आणि मानकर यांच्यासाठी कोणीतरी आग्रही होतं, असा तर प्रकार नव्हता ना.. राष्ट्रवादीला कसबा मतदारसंघ लढवायचाच होता, तर मग ही तयारी आधीच का करण्यात आली नव्हती? पर्वतीच्या बदल्यात कसबा असे सूत्र निश्चित करून वेळीच काकडे यांना कसब्यातून तयारी करण्याबाबत सूचना दिली गेली असती, तर तेही तयारीत राहिले असते. तसे न करता ते तयार नसताना त्यांना शेवटच्या क्षणी निवडणूक लढवायला सांगण्याचा निर्णय नक्की कोणी घेतला आणि त्यांचं नाव उमेदवार म्हणून जाहीर करून त्यांना ए बी फॉर्म कसा दिला गेला? हे सगळं नक्की कोणी केलं, असा प्रश्न सध्या कानगोष्टीत रंगला आहे…

Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray in nagpur
फडणवीस यांची उध्दव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “त्यांना तोंडाच्या…”
pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला