कर्नाटकच्या बंदीला दिवाकर रावते यांचे उत्तर

राज्य परिवहन महामंडळाच्या प्रत्येक बसवर आता ‘जय महाराष्ट्र’ लिहिले जाईल, असे राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शनिवारी पुण्यात  सांगितले. कर्नाटकमध्ये लोकप्रतिनिधींनी ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास पद रद्द करण्याचा इशारा तेथील सरकारने दिल्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर रावते यांना विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले.

Vasant More has many cars gold and silver
वसंत मोरे यांच्याकडे आहेत अनेक गाड्या, सोने आणि चांदी
Congress, Uddhav Balasaheb Thackeray Shivsena,
सांगलीत कॉंग्रेस, उबाठा शिवसेनेत मनोमिलन ?
Kolhapur Lok Sabha, Hasan Mushrif
कोल्हापूरच्या आखाड्यात हेलिकॉप्टरवरून जुंपली
Awaiting declaration for Lok Sabha election of three candidates from Ratnagiri Satara Thane Mumbai
महायुतीमधील पेच कायमच; रत्नागिरी, सातारा, ठाणे, मुंबईतील तीन उमेदवारांच्या घोषणेची प्रतीक्षा

एसटीच्या विभागीय कार्यालयावर बसविण्यात आलेल्या सौरऊर्जा पॅनलचे उद्घाटन रावते यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी ‘जय महाराष्ट्र’ घोषणा देणाऱ्या लोकप्रतिनिधीवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर सीमाभागासह महाराष्ट्रातही त्याचे प्रतिसाद उमटले. महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटकच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून त्या पाठविण्यात आल्या. बेळगावातील मराठी भाषकांनी सरकारच्या निर्णयाविरोधात काढलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलेल्या रावते यांना पोलिसांनी रोखले होते. याबाबत रावते यांना विचारले असता, त्यांनी वरील उत्तर दिले.

नव्या १२०० शिवशाही बस एसटीच्या ताफ्यात एसटीच्या ताफ्यामध्ये पुढील चार महिन्यांत नव्या १२०० शिवशाही बस दाखल होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. पंढरपूरला आषाढीच्या सोहळ्यासाठी एसटीच्या गाडय़ांचे नियोजन करण्यात आले आहे. मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातून गाडय़ांची व्यवस्था करण्यात येणार आहे.  पंढरपूर शहरात कुठेही फिरण्यासाठी बसचे नियोजन असून, त्याचे भाडे दहा रुपये असणार आहे, असेही रावते यांनी सांगितले.