पुण्यातील भूसंपादन अधिकारी धनाजी पाटील याला १ लाख २५ हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी संध्याकाळी सापळा रचून अधिकाऱ्यावर कारवाई केली.

विधान भवनासमोरील नवीन प्रशाकीय इमारतीमधील भूसंपादन अधिकारी धनाजी पाटीलने एका जमीन मालकाकडे १ लाख २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. शासनाने जमीन मालकाची १८ गुंठे जमीन रस्ता रुंदीकरणासाठी संपादीत केली होती. त्याबदल्यात त्यांना  ८३ लाख ६० हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली होती. ही रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी अधिकाऱ्याने सव्वा लाखाची मागणी केली. याप्रकरणी संबंधीत जमीन मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. शासनाने संपादीत केलेल्या जमिनींसाठी त्याने ही लाच मागितली होती, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. लाचलुचपत विभागाने गुरुवारी सापळा रचून सव्वा लाख रुपयांची लाच घेताना धनाजी पाटील या अधिकाऱ्याला अटक केली.