पिंपरी पालिकेतील माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे, मात्र नंतरच्या काळात अपक्ष, आम आदमी पार्टी, स्वराज अभियान या मार्गाने भापकर पुन्हा शिवसेनेत परतले आहेत. चिंचवड स्टेशन-काळभोरनगर-मोहननगर प्रभागात शिवसेनेकडून ओबीसी गटातील उमेदवारी मिळावी, या हेतूने भापकर शिवसेनेत गेले आहेत.

[jwplayer z1simstl]

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भापकर यांच्यासह माजी विरोधी पक्षनेते दत्ता वाघेरे, माजी नगरसेवक प्रतीक झुंबरे, किरण वाघेरे, नंदू बारणे आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.

संपर्कप्रमुख डॉ. अमोक कोल्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे, गटनेत्या सुलभा उबाळे आदी या वेळी उपस्थित होते.

ज्या पध्दतीने प्रभागरचना झाल्या आहेत, ते पाहता अनेकांची राजकीय गणिते बिघडली आहेत. मोठे क्षेत्र असल्याने अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी उमेदवारांची नाही. त्यामुळे त्या-त्या भागात चांगले वातावरण असलेल्या राजकीय पक्षांची निवड करून पक्षप्रवेश करण्याचा सपाटा शहरात सुरू आहे.

[jwplayer TzwZQwr9]

Modi, religious polarization, Marathwada,
‘रजाकारी’ला उजाळा देत मराठवाड्यात मोदींचा धार्मिक ध्रुवीकरणावर भर

women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन

jalgaon uddhav thackeray shivsena marathi news
“भाजप जळगावमध्ये उमेदवार बदलणार”, संजय सावंत यांचा दावा