पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षणाधिकारी व क्रीडा प्रबोधनीच्या मुख्याध्यापकाला जेवण व नाश्ताच्या बिलाचा योग्य अहवाल पाठविण्यासाठी ५००० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (मंगळवार) सकाळी पावणे दहा वाजता करण्यात आली.
शिक्षणाधिकारी अलका ज्ञानेश्वर कांबळे (वय ५४, रा. एचए कॉलनी, पिंपरी), मुख्याध्यापक बाबासाहेब अंबादास राठोड (वय ३४, रा. श्रीराम अपार्टमेंट, राहटणी) अशी लाच घेतलेल्या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. क्रीडा प्रबोधनीमधील विद्यार्थ्यांना जेवण व नाश्ताचा अहवाल पाठविण्यासाठी राठोड यांनी ५००० तर कांबळे यांनी २० हजारांची मागणी केली होती. संबंधित ठेकेदाराने याबाबतची फिर्याद लाचलुचपत प्रतिंबधक विभागात नोंदविली होती. आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेच्या आवारात सापळा रचून दोघांना अटक केली. पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्याचे काम सुरू आहे.