मतदानास प्रोत्साहन देण्यासाठी विविध सवलतींचा पाऊस; टक्का वाढवण्यासाठी सामाजिक संस्था मैदानात 

nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
Employer killed owner for non-payment of wages
ठाणे : मजुरीचे पैसे दिले नाही म्हणून मालकाची चाकू भोसकून हत्या
Accused in gang rape case
सामूहिक बलात्कार प्रकरणातील नऊ वर्ष पसार असलेल्या आरोपीला अटक
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक

महापालिका निवडणुकीमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे यासाठी इको क्लीन कार्सतर्फे नागरिकांना मोफत कार वॉश करून दिली जाणार आहे.

मतदान केल्याची हाताच्या बोटावरील शाईची खूण दाखविल्यानंतर त्यांची कार मोफत धुवून दिली जाणार आहे. ही सवलत मतदानाच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (२१ फेब्रुवारी) सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेसहा या कालावधीत दिली जाणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी इको क्लीन कार्स, गांधीभवन, अंधशाळेजवळ, कोथरूड (मो. क्र. ८८८८६१३११००) या पत्त्यावर संपर्क करावा, असे आवाहन इको क्लीन कार्सचे श्रीराम टेकाळे यांनी केले आहे.

इको क्लीन कार्सतर्फे सलग चौथ्यांदा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यापूर्वी २०१२ ची महापालिका निवडणूक, त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्यावेळीही हा उपक्रम राबविण्यात आला होता. नागरिकांनी मतदानाविषयी उदासीनता दाखवू नये. मतदानाच्या दिवशी  आपले राष्ट्रीय कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून मतदान करीत लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन टेकाळे यांनी केले आहे.

फरसाणवर तीस टक्के सवलत

महापालिका निवडणुकीमध्ये मंगळवारी (२१ फेब्रुवारी) मतदान करणाऱ्या मतदारांना फरसाण खरेदीवर २० ते ३० टक्के सवलत देण्यात येणार आहे.  मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महर्षिनगर येथील भक्ती शॉपीमध्ये ४० प्रकारचे फरसाण, वेफर्सचे १५ प्रकार खरेदीवर २० ते ३० टक्के सवलत आहे.

लायन्स क्लबतर्फे २१ चौकांत जागृती

लायन्स क्लब ऑफ पुणे प्रभाततर्फे शहरातील मुख्य २१ चौकांमध्ये मतदान जागृती अभियान राबवून सुजाण नागरिकांना शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. डेक्कन जिमखाना येथील खंडुजीबाबा चौकापासून या अभियानाला सुरुवात झाली. चौकामध्ये सिग्नलला थांबलेल्या वाहनचालकांना मतदान करण्यासंबंधी आवाहन करणाऱ्या पत्रकाचे वाटप करण्यात आले. मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी घोषित होते. त्यातच सलग सुटय़ा घेऊन नागरिक मतदानाचे कर्तव्य टाळून सहलीला जातात आणि त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होते. लायन्स इंटरनॅशनल क्लबचे यंदा शंभरावे वर्ष आहे. हाच धागा पकडून आम्ही नागरिकांना शंभर टक्के मतदानाचे आवाहन करण्यासाठी ही जागृती सेवा यात्रा शहरात ठिकठिकाणी करणार आहोत, असे लायन्स क्लब पुणे प्रभातचे अध्यक्ष अ‍ॅड. बिपीन पाटोळे यांनी सांगितले.

पिंपरीत मतदान वाढवण्यासाठी मान्यवरांचे आवाहन

पिंपरी  : पिंपरी महापालिका निवडणुकांसाठी मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी पालिका प्रशासनाने अनेक उपक्रमांचे आयोजन केले. त्याचाच एक भाग म्हणजे विविध क्षेत्रांमधील मान्यवरांकडून नागरिकांना मतदानाचे आवाहन करण्याचा स्तुत्य उपक्रम पालिकेने राबवला. याशिवाय, ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय ‘चला हवा येऊ द्या’ मालिकेतील कलावंतांच्या माध्यमातून केलेले मतदानाचे आवाहन लक्षवेधी ठरले आहे.

डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, जयंत नारळीकर, अभय फिरोदिया, प्रशांत दामले, मुक्ता बर्वे, संदीप खरे, अंजली भागवत, शुभांगी गोखले, उमेश कामत,  मृण्मयी जोंधळेकर आदींनी िपपरी पालिकेच्या विनंतीला मान देऊन शहरवासीयांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पिंपरी पालिकेचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत माने, सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने या मान्यवरांची प्रत्यक्ष भेट घेऊन मतदानाचे आवाहन करणारी त्यांची चित्रफीत तयार केली व ती पुढे सर्वत्र पाठवण्यात आली. याशिवाय, भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे या ‘चला हवा येऊ द्या’ च्या कलावंतांचा समावेश असलेली दहा मिनिटांची जनजागृतीपर चित्रफीत करण्यात आली आहे. योगेश शिरसाट यांचाही त्यात सहभाग आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून महापालिकेने विविध स्तरावर मतदारांमध्ये जनजागृती करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. मंगळवारी (२१ फेब्रुवारी) मतदान होणार आहे. या सर्व उपक्रमांचा प्रत्यक्षात मतदान वाढण्यासाठी कितपत उपयोग होतो, हे मंगळवारी दिसून येणार आहे.

‘उबर’कडून मतदारांना खास सवलत

पुणे : उबर टॅक्सी कंपनीकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी (२१ फेब्रुवारी) मतदानाला जाण्यासाठी उबर टॅक्सी सेवेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना खास सवलत जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सहकार्य करण्यात आले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मतदारांना या सवलतीचा लाभ घेता येईल. कमीतकमी पाच किलोमीटर अंतरासाठी ही सवलत लागू राहणार आहे. त्यापोटी मतदारांना ४९ रुपयांची सवलत दिली जाणार आहे.

सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत या सवलतीचा लाभ घेता येईल. पाच किलोमीटर अंतराच्या पुढे नियमित दर आकारले जाणार आहेत, अशी माहिती उबेरचे कार्यकारी व्यवस्थापक बन्सी कोटेचा यांनी दिली आहे.

या उपक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सहकार्य केले आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा ज्येष्ठ नागरिकांना फायदा होईल, असे कोटेचा यांनी सांगितले.