पुण्यातील धायरी भागात अडीच वर्षांच्या चिमुरडीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.  याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.

धायरीत राहणारी श्रुती विजय शिवगणे या चिमुरडीचे शनिवारी रात्री अपहरण झाले होते. रात्री तिच्या आईने सिंहगड पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. शनिवारी सकाळी प्रायोजा सिटीच्या मागे श्रुतीचा मृतदेह आढळला. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. या घटनेने धायरी परिसरात खळबळ माजली आहे.