पुणे शहरात नुकताच मेट्रोच्या प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. पहिल्या फेजमध्ये वनाज ते रामवाडी हा मेट्रोमार्ग तयार होणार आहे. वनाज ते रामवाडी या मेट्रो प्रकल्पाचा मार्ग मुळा आणि मुठेच्या नदीपात्रातून जातो. ही अत्यंत धोकादायक बाब असल्याचा इशारा जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी दिला आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप प्रसंगी ते बोलत होते. महापालिका प्रशासनाच्या वतीने यापूर्वी देखील नदी पात्रातून रस्ते बनविले. आता मेट्रोचा मार्ग होणार आहे. हे योग्य नसून मेट्रो प्रकल्पाचे नियोजन करताना यात बदल करण्याची आवश्यकता आहे, असे सिंह म्हणाले. तसेच, नदीचे पात्र हे आरक्षित आहे. त्यावर कोणत्याही प्रकारची कामे होता कामा नये. अशी भूमिका त्यांनी मांडली. सुरुवातीच्या काळापासून ते आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांनी नद्यांच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली. मात्र आज ही नद्यांची परिस्थिती तशीच आहे.

Unannounced shutdown in Kalyan city due to Prime Minister Narendra Modis meeting
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने कल्याण शहर अघोषित बंद
Traffic changes on internal routes in Kalyan city for Narendra Modis meeting
नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी कल्याण शहरात अंतर्गत मार्गांवर वाहतुक बदल
Chandrapur, Woman died, tiger attack,
चंद्रपूर : वाघाने घेतला महिलेचा घास, तेंदूपत्ता गोळा करत असताना…
Nrusinhawadi, Five members,
एकाच कुटुंबातील पाचजण नृसिंहवाडीत नदीत बुडाले; वजीर रेस्क्यूच्या जवानांनी वाचवले प्राण
pune, woman s husband, Husband Sets Fire to 15 Bikes, Fire to 15 Bikes, Teach Mother in Law a Lesson, mother in law, husband wife dispute, husband mother in law dispute, crime news, fire brigade, bikes fire, fire news, marathi news,
धक्कादायक : पत्नी, सासूला धडा शिकवण्यासाठी १५ दुचाकी जाळल्या
Terrible accident on Nagpur Chandrapur highway
नागपूर-चंद्रपूर महामार्गावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत मायलेकीसह ३ ठार
Four people were died in an accident on Ralegaon-Kalamb road
वऱ्हाड्यांच्या बसला ट्रकची धडक, दोन सख्ख्या बहिणींसह चार ठार; राळेगाव-कळंब मार्गावरील घटना
gangster participating in murlidhar mohol election campaign says maha vikas aghadi candidate ravindra dhangekar
मुरलीधर मोहोळ यांच्या पदयात्रेत गुंडांचा समावेश; महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर

मी पुणे शहरात मागील १० वर्षांपासून येत असून मुळा-मुठा नदीमधून घाण पाणी वाहताना पाहून दुःख होते. अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या नद्यांतील पाणी पुढे उजनी धरणामध्ये जाते आणि सोलापूर मधील नागरिक हे पाणी पितात. हे चित्र बदलण्याची गरज असून पुण्यात या कामासाठी सर्व नागरिक एकत्र आल्यास नक्कीच ‘अच्छे दिन’ येतील. त्याचबरोबर नद्या जगल्या पाहिजेत, स्वच्छ पाणी नदीमध्ये असले पाहिजे. मात्र, सध्या नद्यांची अवस्था पाहून त्या आजारी पडल्या आहेत असे दिसते. नद्या आजारी पडल्या तर शहरातील नागरिक देखील आजारी पडतील. तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन नदी प्रश्नावर काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या फेजमध्ये ३१.२५ किमीची मार्ग तयार केला जाणार आहे. पुणे मेट्रो प्रकल्पामध्ये १७,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. पुणे मेट्रो २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. पुण्यातील पहिली मेट्रो लाइन पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट अशी असणार आहे. ही लाइन १६.६ किमी ची असून एकूण १५ स्टेशन असणार आहेत. ५ किमीची लाइन ही भुयारी मार्ग असणार आहे तर ९ किमीचा मार्ग हा उन्नत ( इलेव्हेटेड) मार्ग असणार आहे. तर, वनाज ते रामवाडी हा मार्ग १६ स्टेशन्सचा असून सर्व पूर्ण मार्ग हा उन्नत मार्ग आहे. या मार्गाची लांबी १४.९३ किमी असणार आहे. वनाज ते रामवाडी मार्ग हा नदीपात्रातून जातो. या मार्गाच्या कामाला राष्ट्रीय हरित लवादाने अंतरिम स्थगिती दिली आहे.