शिक्षक दिन झाला, स्वच्छता अभियान झाले आता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीला (३१ ऑक्टोबर) महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्याच्या सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिल्या आहेत. राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने ‘रन फॉर द युनिटी’ उपक्रम आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
देशातील महाविद्यालये आणि विद्यापीठे सध्या दरमहा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यातच गुंग आहेत. शिक्षक दिन झाला, मोदींनी जाहीर केलेले स्वच्छता अभियानही सुरू झाले. आता राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्याचे केंद्र शासनाने ठरवले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी (३१ ऑक्टोबरला) राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात येणार आहे. देशातील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने सूचना दिल्या आहेत.
राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने ‘रन फॉर द युनिटी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे. विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्या सहभागाने हा उपक्रम आयोजित करावा. त्याचप्रमाणे इतर नागरिकांनाही त्यात सहभागी करून घ्यावे. या दिवशी एकतेची शपथ घेण्यात यावी, अशा सूचना आयोगाने केल्या आहेत. त्याचप्रमाणे एनएसएसच्या विद्यार्थ्यांचे संचलन, चर्चासत्रे, वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी प्रदर्शन, स्पर्धा अशा उपक्रमांचेही आयोजन करण्यात यावे, असे आयोगाने कळवले आहे. आयोगाचे अध्यक्ष वेद प्रकाश यांच्या स्वाक्षरीने विद्यापीठांना पत्र पाठवण्यात आले आहे. केलेल्या उपक्रमांचा अहवाल पाठवण्यासंबंधीही आयोगाने सूचना दिली आहे.

CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
Love Jihad, pune, Pune University
‘लव्ह जिहाद’च्या आरोपावरून मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल; पुणे विद्यापीठाच्या आवारातील घटना
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!
Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?