राहुल कलाटे, शिवसेना

निवडणुकीची तयारी कशी आहे?

शिवसेनेची निवडणुकीसाठी पूर्ण तयारी आहे. वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या आहेत. ‘वॉर रूम’ तयार करण्यात आली आहे. सर्वेक्षण केलेले अहवाल प्राप्त झाले आहेत. गटप्रमुख, पदाधिकारी, इच्छुक उमेदवार एकत्रितपणे काम करत आहेत. दीड वर्षांपूर्वी शहराध्यक्षपद मिळाले, तेव्हापासून पालिका निवडणुकांचे नियोजन सुरू असून पक्षबांधणीस प्राधान्य दिले आहे. दीड वर्षांत विविध विषयांवर अनेक आंदोलने झाली. पक्षाचे विविध पातळीवर मेळावे घेण्यात आले आहेत. सद्यस्थितीत शिवसेनेला अतिशय चांगले वातावरण असून त्याचा निवडणुकीत फायदा होईल.

निवडणुकीत कोणते मुद्दे काय असतील?

शहरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक आहे. पाण्याची समस्या तीव्र आहे. २४ तास पाणी देण्याची घोषणा होत असली तरी अजूनही टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे. यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील अनागोंदीमुळे सामान्य कुटुंबांमधील रुग्णांचे हाल होत आहेत. शिक्षण व आरोग्य व्यवस्था ढासळली आहे. मोठे प्रकल्प अट्टाहासाने राबवण्यात आले. मात्र, सर्वसामान्य माणूस केंद्रिबदू ठेवण्यात आला नाही. पालिका श्रीमंत आहे. मात्र, नियोजन नाही. पवना धरण वगळता दुसरे

पाण्याचे स्रोत नाही. बंदनळ योजना पूर्ण होऊ शकली नाही. लोकसंख्या वाढली, पाणी वाढू शकले नाही. वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, प्रवाही व वेगवान वाहतुकीसाठी शिस्त गरजेची आहे.

[jwplayer EgsawSD5]

महापालिकेतील कारभाराबद्दल..

िपपरी पालिकेचा कारभार भ्रष्ट आहे. सत्ताधारी सामान्य जनतेला विसरले आहेत. नागरिकांच्या दैनंदिन गरजा त्यांनी लक्षात घेतल्या नाहीत. अनेक ठिकाणी करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी झाल्याचे दिसून येते. शिवसेनेने सभागृहात व रस्त्यावरही सामान्यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलने केली आहेत.

शिवसेना-भाजप युतीविषयी..

भाजपशी युती करण्याबाबत शिवसेना सकारात्मक आहे. अवास्तव मागणी करण्याचा आमचा विचार नाही. शहरात शिवसेनेचा पाया भक्कम आहे. शहरात शिवसेनेची पारंपरिक मते आहेत. पक्षाकडे दोन खासदार व एक आमदार आहेत. निवडून येऊ शकतील, असे उमेदवार आहेत, या सर्व गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे. शिवसेनेकडे सर्व भागात उमेदवार आहेत. युती न झाल्यास स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी आहे. पक्षात बिलकूल गटबाजी नाही. खासदार, आमदार व आम्ही सर्व पदाधिकारी एकत्र मिळून काम करतो आहे. सांघिक प्रयत्नांचे यश नक्कीच मिळेल.

[jwplayer vnCPvcot]