प्रेमप्रकरणातून पुण्यामध्ये मंगळवारी सकाळी एका २० वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केली. हडपसरमधील सत्यपूरम सोसायटीमध्ये घरातच गळफास लावून घेत या तरुणाने आत्महत्या केली. या मुलाचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यातील तणावामधून त्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.