पुण्यातील येरवडा कारागृहात दुसऱ्या कैद्याला विडी देण्यावरून दोन कैद्यांमध्ये आज (सोमवार) दुपारी हाणामारी झाली. यात एक कैदी जखमी झाला आहे. या घटनेबाबत येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहात अक्षय लोणारे हा बलात्काराच्या गुन्ह्यात तर अजय माटी हा खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास संशयित आरोपी अजय याने दुसऱ्या एका आरोपीला विडी दिली. त्या कारणावरून अक्षय लोणारे यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत अक्षय याने अजय माटीला दगड फेकून मारला. त्यात अजय हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले. या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.