अधिकृत फेरीवाले क्षेत्रांची निर्मिती करून गैरव्यवहार थांबवण्याची मागणी
कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक परिसराला फेरीवाल्यांचा गराडा ही नित्याचीच बाब आहे. फेरीवाल्यांसाठी पालिका क्षेत्रात फेरीवाले क्षेत्र (हॉकर्स झोन) तयार करण्यासाठी गेली कित्येक वर्षे प्रयत्न करीत आहे, परंतु पालिका अधिकाऱ्यांच्या आर्थिक हितसंबंधामुळे या फेरीवाल्यांना अद्याप हक्काची जागा मिळाली नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींचा वरदहस्त, पालिका अधिकारी व फेरीवाले यांच्यातील हितसंबध यामुळे येथील नागरिक नाहक भरडला जात आहे. या फेरीवाल्यांची योग्य ती सोय करून हा परिसर मुक्त करावा, अशी मागणी नागरिक वारंवार करत आहेत. पालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडून नागरिकांना तसेच फेरीवाल्यांनाही आशा असून या समस्येवर तोडगा निघेल, असे नागरिकांना वाटते.
कल्याण-डोंबिवली परिसरात दहा हजार फेरीवाल्यांची नोंद करण्यात आली आहे. यात कल्याण-डोंबिवली स्टेशन परिसरात एक ते दीड हजार फेरीवाले बसलेले असतात तर इतर लहान रस्त्यांवर सव्वाशे फेरीवाले दिसून येतील. रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या बस्तानामुळे येथे मोठय़ा प्रमाणावर गर्दी होते, तसेच वाहतूक कोंडीची समस्या जाणवते. नागरिकांना फेरीवाल्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून या परिसरातून फेरीवाले हटवण्याची मागणी मध्यंतरी झाली. त्यावर अद्याप काही झालेले नाही. रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांमधून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी पालिकेने रेल्वे पुलालगत पादचारी पूल बांधले, परंतु तेही फेरीवाल्यांनी बळकावले. या फेरीवाल्यांना कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ठरावीक जागा नेमून देण्यासाठी सात फेरीवाले क्षेत्र (हॉकर्स झोन) तयार करण्यात आले होते. परंतु हे मोक्याच्या ठिकाणी नसल्याने फेरीवाला समितीने याला विरोध केला. पालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक कारवाईचा केवळ दिखावा करते, ही कारवाई शक्यतो हप्ता गोळा करण्यासाठीच असते, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यंदा फेरीवाल्यांची नोंदणी क रून त्यांना जागा निश्चित करून देणार आहे. परंतु अद्याप ही प्रक्रिया सुरूच असून महिन्याला पालिका अधिकाऱ्यांना लाखोचे उत्पन्न फेरीवाल्यांकडून मिळत असल्याने या फेरीवाल्यांना अधिकृत जागा देण्याची प्रक्रिया हे पालिकेचेच अधिकारी लांबवीत असल्याचा आरोप फेरीवाल्यांकडून केला जात आहे.
रेल्वे स्थानके, वाहतुकीचे रस्ते यांवर फेरीवाल्यांना बसू देण्यास कायद्यानेही विरोध असून अशी जागा बळकावणे बेकायदा आहे. फेरीवाला झोन होईल तेव्हा होईल तोपर्यंत पर्यायी जागा अथवा सध्या जेथे व्यवसाय करतो तेथे पट्टे मारून द्या, अशी मागणी पालिकेकडे केली आहे. परंतु पालिकेने आमच्या समस्यांकडे लक्ष दिलेले नाही असे कष्टकरी हॉकर्स युनियनकडून सांगण्यात येते.

फेरीवाल्यांचे अड्डे
’डोंबिवली पूर्व – स्टेशन परिसर, रथ रोड, नेहरू रोड, शिवमंदिर रोड, राजाजी रोड, चिमणी गल्ली, भाजी मार्केट परिसर, बाजी प्रभू चौक.
’डोंबिवली पश्चिम – स्टेशन परिसर, सम्राट हॉटेल, घनश्याम गुप्ते रोड, महात्मा गांधी रोड
’कल्याण पूर्व – कोळसेवाडी, रेल्वे बोगदा, पुणे लिंक रोड, नेतिवली, खडेगोळवली, काटेमानिवली, विठ्ठलवाडी बस स्थानक परिसर.
’कल्याण पश्चिम- स्टेशन परिसर, शिवाजी चौक, लक्ष्मी मार्केट, सहजानंद चौक, राम बाग, लाल चौकी खडकपाडा, खानकर पाडा.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
thieves firing at malkapur railway station
मलकापूर रेल्वेस्थानक परिसरात चोरट्यांचा गोळीबार; पाठलाग करणाऱ्या नागरिकांना…
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी