ऑक्टोबर महिन्यात पोलंडमध्ये होणाऱ्या ‘मिस व्हिलचेअर’ सौंदर्य स्पर्धेत ३१ वर्षांची राजलक्ष्मी भारताचं प्रतिनिधित्त्व करणार आहे. २०१४ मध्ये झालेल्या ‘मिस व्हिलचेअर इंडिया’ स्पर्धेत तिने ‘मिस व्हिलचेअर’चा किताब पटकावला होता.

राजलक्ष्मी डेंटिस्ट आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या गाडीला अपघात झाला होता. अपघातामुळे तिला कायमच अपंगत्त्व आलं. पण अपंगत्त्व असतानाही खचून न जाता तिने आपल्या आवडीच्या विषयात अभ्यास करणं सुरूच ठेवलं. वैद्यकिय क्षेत्रातल्या अभ्यासाबरोबर तिचा फॅशनविश्वातला कलही वाढत होता. तिने फॅशन क्षेत्रातली आपली अभिरुची जपली. २०१४ मध्ये झालेल्या ‘मिस व्हिलचेअर’ स्पर्धेत सहभाग घेऊन तिने साऱ्या जागचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.

वाचा : वादग्रस्त ट्विटमुळे सौंदर्यवतीने गमावला किताब!

तिने व्हिलचेअर बास्केटबॉल स्पर्धेत आणि नृत्यस्पर्धेतही सहभाग घेतला होता. राजलक्ष्मीचा दवाखाना देखील असून, ती अनेक सामजिक कार्यात आवर्जून भाग घेते. दुर्दैवाने अपघातामुळे तिचं आयुष्य उद्धवस्त झालं असलं, तरी तिने जगणं मात्र सोडलं नाही. त्याचबरोबर इतरांनादेखील ती जगण्याची उमेद देत आहे.

वाचा : तुम्हीसुद्धा प्रेमात आहात? मग ही जय आणि सुनिताची प्रेमकहाणी नक्की वाचा…