तुम्हीसुद्धा एकट्याने प्रवास करताय? तुम्हीही हॉटेल बुकिंग ऑनलाइन करताय? मग तुम्ही फेसबुकवर सध्या व्हायरल होत असेलला एका सोलो ट्रॅव्हलर महिलेचा किस्सा जरूर वाचा. एका ऑनलाइन हॉटेल बुकिंग साईटवरून हैदराबादमध्ये तिने रुम बुक केली होती, हॉटेलकडून रुम बुक झाल्याचं निश्चित करण्यात आलं. पण जेव्हा ती हॉटेलमध्ये पोहोचली तेव्हा ती एकटी असल्यानं हॉटेलमध्ये तिला प्रवेश नाकारण्यात आला. सिंगल महिलेला प्रवेश नाही, असं सांगत तिला कितीतरी वेळ हॉटेल बाहेर ताटकळत उभं रहावं लागलं.

वाचा : फेसबुकवर प्रोफाईल पिक्चरची चोरी रोखण्यासाठी ‘हे’ करा

हैदराबादमध्ये आलेल्या नुपूर सारस्वत हिने हा किस्सा सोशल मीडियावर शेअर केलाय. ‘माझ्याकडे ऑनलाइन बुकिंग असूनही मला प्रवेश नाकारण्यात आलाय. का तर मी एकटीच आहे. हॉटेलमध्ये राहायला जागा देण्याऐवजी मला तासन् तास बाहेरच उभं करण्यात त्यांना समाधान वाटत आहे. त्यांच्या हॉटेलपेक्षा मी फुटपाथवर जास्त सुरक्षित आहे, असं त्यांना वाटतंय,’ अशी पोस्ट नुपूरने केली. तिने गोआयबीबोवरून हैदराबादमधलं Deccan Erragadda हे हॉटेल बुक केलं होतं. यावर नुपूरने ट्विट करत गोआयबीबोला या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. या वेबसाईटची जाहिरात करणाऱ्या दीपिकाला पदुकोणलाही तिने आपल्या ट्विटमध्ये मेन्शन केलं. अखेर गोआयबीबोने तिच्या ट्विटची दखल घेतली. आपण चौकशी करून या हॉटेलचं नाव आपल्या यादीतून वगळण्याचं आश्वासन नुपूरला दिलं. नुपूरच्या तक्रारीची दखल घेत या वेबसाईटने नुपूरला दुसरी जागा आणि नुकसान भरपाई देऊ केली.

VIDEO: कॅप्टन मितालीचा कूल अंदाज; बॅटिंगआधी पुस्तक वाचन

या प्रकरणानंतर हॉटेलनं गोआयबीबोला स्पष्टीकरण दिलंय. ‘हे हॉटेल ज्या भागात आहे, तो भाग एकट्या राहणाऱ्या मुलींसाठी सुरक्षित नाही. त्यामुळेच आम्ही नुपूरला प्रवेश नाकारला’, असं त्यांनी सांगितलं.