लहानपणी आमच्या उरणनागांवच्या वाडीत घराच्या बाजूलाच चिंचेचे मोठे पसरलेले, उंच झाड होते. त्या झाडाला मोठा दोर आणून त्या दोराच्या मध्ये चादरीची खोलगट बैठक करून त्यात बसून हिरव्या सावलीतले उंच उंच झोके अजूनही मनाच्या कोपऱ्यात झोके घेतात.

झुला, झोपाळा, पाळणा प्रत्येकानेच अनुभवलेला असतो. सुगंधी, रंगीबेरंगी हारा-फुलांनी सजून, फिरत्या भिंगरीच्या खेळण्याच्या गमतीत, ठरलेले नाव फुला-रांगोळ्यांसह गुपित सांभाळत, कुणी राम घ्या, कुणी लक्ष्मण घ्याच्या सुरेल लयीत, बाळाचे नाव पाळण्याच्या कुशीत, पाळण्याच्या साक्षीने बाळाच्या कानात ऐकवून प्रचलित केले जाते. पाळणा गीताच्या सुरांवर बाळाच्या उंच झोक्यांची सुरुवात इथूनच होते. अशा प्रकारे अगदी बालपणापासूनच पाळण्याची संगत प्रत्येकालाच लाभलेली असते.

Video How To Clean Sticky Oil Bottle with Spoonful of Rice Remove Bad Smell and stickiness from plastic
तेलाच्या चिकट बाटलीत चमचाभर तांदूळ टाकून तर बघा; ५ मिनिटांत डाग, दुर्गंध असा करा गायब, पाहा Video
An increase in the price of silver compared to gold
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ… हे आहे आजचे दर…
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर
How To Make Home Made Raw Banana Fry Or Maharastrian Style Kachya Kelyache Kaap Note Recipe
१० मिनिटांत करा ‘कच्च्या केळ्यांचे तिखट काप’; ‘ही’ चटपटीत रेसिपी लगेच नोट करा…

वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे पाहण्यात येतात. लहान बाळाचा झोपायचा पाळणा, घरात टांगण्यात आलेला खुर्चीचा पाळणा, गार्डनमधील लोखंडी बैठक व साखळीचे पाळणे, बाकडय़ाचे पाळणे, घरात किंवा ओटीवर लावले जाणारे वेताचे पाळणे, दोन झाडांचा आधार घेऊन बांधलेले जाळीचे झोपायचे पाळणे, घरात झोपण्यासाठीही वापरले जाणारे फळीपासून केलेले मोठे झोपाळे..

लहानपणी आमच्या उरण-नागांवच्या वाडीत घराच्या बाजूलाच चिंचेचे मोठे पसरलेले, उंच झाड होते. त्या झाडाला मोठा दोर आणून त्या दोराच्या मध्ये चादरीची खोलगट बैठक करून त्यात बसून हिरव्या सावलीतले उंच उंच झोके अजूनही मनाच्या कोपऱ्यात झोके घेतात. एका आंब्याच्या झाडाची फांदी खालूनच पुढे सरळ आडवी वाढली होती. ती इतकी खाली होती की त्यावर बसले की पाय खाली टेकता यायचे. चांगली जाडजूड व मजबूत असल्याने मी त्यावर बसून मागे-पुढे, वर खाली झोके घ्यायचे. हा अगदी नैसर्गिक व नित्यनियमाचा पाळणा होता.

सार्वजनिक बागेतल्या पाळण्यासाठी नंबर लावावा लागे (अजूनही बागेत लहान मुलांची तीच परिस्थिती आहे.) बागेत गेले की कोणीतरी बसलेले उठेल व पाळणा आपल्याला मिळेल हे प्रतीक्षेचे क्षण तेव्हा लांबलचक वाटायचे. एकदा का पाळण्यावर बसलेला मुलगा किंवा मुलगी उतरली की, आता नंबर आपलाच असूनही कोणी मध्ये येऊ  नये म्हणून धडपडतच पाळणा पकडला जायचा. बरोबर असलेल्या मैत्रिणीबरोबरही हा पाळणा शेयर करावा लागायचा तेव्हा झोके आकडय़ात मोजून आकडय़ांवर झोक्यांचे विभाजन व्हायचे. पाठून कोणी झोका देणार असेल तर उंच जावा म्हणून-अजून जोरात अजून जोरात- करत आकाशाला भिडण्याचा मोह व्हायचा. कोणी नसेल तर स्वत:चे पाय टेकून उंच झोके घेतले जायचे. बागेतले पाळणे बऱ्याचदा इकडून मोडलेले, तिकडे भोक पडलेले असे असायचे पण त्याची तेव्हा पर्वा नसायची.

सासरी उरण-कुंभारवाडय़ात आमच्या घरी तीन पाळणे आहेत. एक ओटीवरचा फळीचा ओटीच्या रुंदीला मावेल असा पाळणा आहे. त्यावर आम्ही निवांतपणे बसतो. एक बागेतील फळीचा मोठा पाळणा. संध्याकाळी या पाळण्यावर बसून निसर्ग अनुभवता येतो. या पाळण्याची गंमत म्हणजे या पाळण्याला पावसाळी सुट्टी असते. फळीचा असल्याने पाण्याने खराब होऊ  नये म्हणून हा पाळणा काढून पडवीत ठेवण्यात येतो. पाऊस गेल्यावर पुन्हा जागेवर लावून त्याची रंगरंगोटी केली जाते. तिसरा म्हणजे पारावर दोरीने बांधलेला छोटय़ा मुलांसाठीचा पाळणा. यावर घरातील बच्चे कंपनी गंमत जंमत करत असते.

प्रत्येक ठिकाणी पाळण्याचे वेगवेगळे वैशिष्टय़ दिसत असते. लहान मुलांचा बागडता पाळणा, एखाद्या प्रेक्षणीय स्थळी असलेला विश्रांतीसाठीचा निवांत पाळणा, डोहाळे जेवणासाठी सजवलेला मातृत्वाच्या स्वागताचा पाळणा, वृद्ध आपल्या सहचाऱ्यांसोबत हलकेच झोके घेत असलेला नम्र पाळणा, देवळात रामजन्म, कृष्णजन्माचे सजवलेले पाळणेही किती प्रसन्न वाटतात. कितीतरी प्रकार असतील पाळण्याचे. पाळण्याचे झोके हे लहानपणीच नाही तर आयुष्यभर साथ देतात. जीवन म्हणजे एक प्रकारचा पाळणाच आहे. सुख-दु:ख, यश-अपयश अशा बाबींचे झोके उंच-खाली होत असताना पाळण्याचा दोर घट्ट धरून ठेवायचा असतो या सत्याची पाळणा आपल्याला शिकवण देत असतो.

prajaktaparag.mhatre@gmail.com