लोकसभेच्या रणमैदानात राज्यभर काँग्रेसविरोधी लाट असताना नांदेड व लगतच्या िहगोलीत मात्र काँग्रेसने यशाचा झेंडा रोवला. या यशाने कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण असतानाच काँग्रेसमधील काहींनी विधानसभा निवडणुकीत बंडाचा झेंडा फटकवला. या पाश्र्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कसोटी लागणार आहे. मतांचे मोठय़ा प्रमाणात विभाजन अटळ असल्याने काँग्रेससह शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आदी पक्षांच्या प्रमुख उमेदवारांची विजयासाठी दमछाक होत आहे.
जिल्ह्य़ाात गेल्या वेळी ९ पकी ७ जागा काँग्रेस, तर २ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. लोकसभेच्या मैदानात मुखेडवगळता सर्वच विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसला आघाडी मिळाली. मात्र युतीचा घटस्फोट व आघाडीत बिघाडी यामुळे काही मतदारसंघांत धक्कादायक निकाल लागल्यास आश्चर्य वाटू नये, असे चित्र आहे. अशा वेळी काही जागा पदरात पाडून घेण्याची विरोधी पक्षांपुढे संधी आहे, तर भविष्यातील राजकीय पुनर्वसनासाठी जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यापुढे आहे.
माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, माजी केंद्रीयमंत्री सूर्यकांता पाटील, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, भोकरचे उपनगराध्यक्ष नागनाथ घिसेवाड आदींनी भाजपत, तर माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे काही मतदारसंघांत चुरशीच्या लढती होणार आहेत.
नांदेड उत्तर
स्वच्छ प्रतिमेचा राजकारणी अशी ओळख असणारे डी. पी. सावंत गेल्या निवडणुकीत विजयी झाले. माजी महापौर सुधाकर पांढरे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आधी शिवसेना व नंतर भाजपत प्रवेश करून उमेदवारी मिळविली. राष्ट्रवादीनेही डॉ. सुनील कदम, सेनेने मििलद देशमुख, मनसेने दिलीप ठाकूर यांच्या रूपाने आव्हान उभे केले आहे. बसपतर्फे सुरेश गायकवाड िरगणात आहेत. येथे शिवसेनेचे १० नगरसेवक आहेत. पूर्वी काही भाग मुदखेड मतदारसंघात होता. तरोडा व ग्रामीण भागात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. कोणतेही गट-तट न मानणाऱ्या, सर्वाशी सलोखा ठेवणाऱ्या सावंत यांच्यापुढे गड राखण्याचे आव्हान आहे.
किनवट
एकेकाळी नक्षलवाद्यांचा तालुका अशी ओळख असणाऱ्या या मतदारसंघात दहा वर्षांपासून राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. सूर्यकांता पाटील समर्थक आमदार प्रदीप नाईक यांनी दोन निवडणुकांत यश मिळविले. पण आता सूर्यकांता पाटील भाजपमध्ये गेल्याने त्यांचे काही समर्थक नाईक यांच्यापासून दुरावले आहेत. कधी भाजप, तर कधी काँग्रेसचा लोकप्रतिनिधी देणाऱ्या या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाकपचे सुभाष जाधव विजयी झाले. राष्ट्रवादीने नाईक यांना पुन्हा संधी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे डॉ. बी. डी. चव्हाण, मनसेतर्फे धनराज पवार आदी एकूण २९ उमेदवार िरगणात आहेत.
भोकर
काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघावर गोरठेकर व चव्हाण कुटुंबीयांची पकड आहे. पूर्वीचा धर्माबाद व आता भोकर मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत अशोक चव्हाण लाखापेक्षा अधिक मताधिक्य़ाने विजयी झाले होते. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर काँग्रेसने अमिता चव्हाण यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात भाजपकडून माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, राष्ट्रवादीतर्फे धर्मराज देशमुख, शिवसेनेकडून बबन बारसे यांच्यासह अन्य ७१ उमेदवार िरगणात आहेत. अशोक चव्हाण यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी व्यूहरचना केली आहे.
कंधार
स्वातंत्र्यानंतर सतत तीन वेळा शेकापने विजयाचा झेंडा रोवलेल्या या मतदारसंघात १९८० च्या निवडणुकीत काँग्रेसचे ईश्वरराव भोसीकर विजयी झाले. त्यानंतर १९८५ व १९९० मध्ये शेकापने विजय मिळविला. १९९५ मध्ये पहिल्यांदाच या मतदारसंघावर भगवा फडकला. १९९९ मध्ये शिवसेनेने विजय मिळवला. २००४ मध्ये अपक्ष म्हणून प्रताप पाटील चिखलीकर विजयी झाले. गेल्या निवडणुकीत मात्र अल्प मतांनी त्यांचा पराभव झाला. चिखलीकर आता सेनेचा भगवा झेंडा घेऊन मैदानात उतरले आहेत. विद्यमान आमदार शंकरअण्णा धोंडगे, काँग्रेसतर्फे डॉ. श्याम तेलंग, भाजपतर्फे डॉ. मुक्तेश्वर धोंडगे, मनसेतर्फे माजी आमदार रोहिदास चव्हाण असे २२ उमेदवार िरगणात आहेत.
हदगाव
पंधरा वष्रे शिवसेनेच्या आमदाराला विजयी करणाऱ्या या मतदारसंघाने गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या माधवराव पाटील जवळगावकर यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात १९७८चाअपवाद वगळता काँग्रेसची पाठराखण केली. १५ वष्रे या भागाचे नेतृत्व करणाऱ्या सुभाष वानखेडे यांनी भाजपत प्रवेश केल्याने काँग्रेसच्या उमेदवाराला दिलासा मिळाला. काँग्रेसने माधवराव पवार यांना पुन्हा संधी दिली. त्यांच्यासमोर शिवसेनेने नागेश पाटील आष्टीकर, भाजपने लता कदम, बसपने जाकेर चाऊस, राष्ट्रवादीने प्रताप देशमुख यांना िरगणात उतरविले.
नांदेड दक्षिण
गेल्या वेळी ओमप्रकाश पोकर्णा विजयी झाले होते. त्या वेळी मुस्लीम समाज काँग्रेसच्या पाठीशी होता. आता या मतदारसंघात राज्यात सर्वाधिक म्हणजे ८५ उमेदवार िरगणात आहेत. मुस्लीम समाजाची मते निर्णायक ठरूशकतात. सेनेने हेमंत पाटील यांना पुन्हा संधी दिली. महापालिकेचे माजी सभापती दिलीप कंदकुत्रे यांनी अशोक चव्हाणांची साथ सोडून भाजपशी घरोबा करून उमेदवारी मिळविली. महापालिका निवडणुकीत राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या ‘एमआयएम’नेही येथे उमेदवार उभा केला आहे. बसपतर्फे काँग्रेसमधून आलेले अनवर जावेद नशीब अजमावत आहेत.
देगलूर-बिलोली
आंध्र-कर्नाटक सीमेवरील देगलूर-बिलोली मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व राहिले. जनता दलाचे गंगाधर पटने येथून एकदा विजयी झाले होते. पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाला. गेल्या निवडणुकीत रावसाहेब अंतापूरकर यांचा विजय झाला. काँग्रेसने त्यांना पुन्हा संधी दिली. राष्ट्रवादीतर्फे मारोती वाडेकर, सेनेकडून माजी आमदार सुभाष साबणे, उद्योगपती भीमराव क्षीरसागर यांना भाजपने िरगणात उतरविले.
नायगाव
पुनर्रचनेनंतर नायगाव नवीन मतदारसंघ झाला. गेल्या निवडणुकीत अपक्ष लढणाऱ्या वसंत चव्हाण यांनी बापूसाहेब गोरठेकर यांचा पराभव केला. विजयानंतर काँग्रेसचे सहयोगी सदस्य मिळवणाऱ्या वसंत चव्हाण यांना पक्षाने पुन्हा संधी दिली. राष्ट्रवादीने बापूसाहेब गोरठेकर, भाजपने राजेश पवार, शिवसेनेने बाबाराव एंबडवार यांना मैदानात उतरवले. मतविभाजनात कोण बाजी मारतो, याचीच उत्सुकता आहे.
मुखेड
पूर्वी राखीव असलेल्या या मतदारसंघावर काँग्रेसच्या उमेदवाराने अनेकदा विजय मिळवला. १९९५ मध्ये युतीची लाट असताना काँग्रेसने विजय राखला. १९९९ मध्ये शिवसेनेने, तर २००४ मध्ये मतदारसंघ खुला झाल्यानंतर काँग्रेसचे हणमंत पाटील बेटमोगरेकर विजयी झाले. आता बेटमोगरेकर यांच्यासह गोिवद राठोड (भाजप), व्यंकट लोहबंदे (शिवसेना), डॉ. व्यंकट सुभेदार (राष्ट्रवादी) िरगणात आहेत.

Sangli, Congress palm symbol, Congress,
सांगलीत सलग दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे हाताचा पंजा चिन्ह गायब
congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
Jalna Lok Sabha
जालना मतदारसंघात काँग्रेसमध्ये चिडीचूप
spokesperson, Congress
काँग्रेसमध्ये जीव घुसमटणाऱ्या प्रवक्त्यांची भाजपमध्ये पोपटपंची !