vv17नृत्यकलेचा एक नवीन आयाम सध्या अनेकांच्या लक्षात आलाय.. कॅलरी बर्निगसाठीचा. सध्या जमाना आहे फिटनेस डान्सचा. काय आहे हा फंडा? कुठले डान्स यामध्ये येतात? प्रसिद्ध अभिनेते आणि नृत्यप्रशिक्षक नकुल घाणेकर सांगताहेत डान्स अॅण्ड फिटनेसचं गणित.

भारतातच नव्हे तर युरोप, अमेरिका सगळीकडेच अतिशय सुसाट वेगात लोकप्रियता मिळवणारी नृत्यशैली ती म्हणजे ‘बॉलरूम डान्सिंग’. कथक, हिप-हॉप, कन्टेम्पररी हे सर्व मूलत: एकलनृत्याचे प्रकार आहेत. तसंच बॉलरूम डान्स्िंाग हा युगल-नृत्याचा प्रकार आहे. म्हणजेच दोन नर्तकांनी एकत्र करण्याचा प्रकार, जोडीने करायचे नृत्य. पूर्वी आपल्याकडे ‘बॉलरूम डान्सिंग’ ऐवजी नुसतंच ‘बॉलडान्स’ म्हणणं प्रचलित झालं. पण डान्सचा प्रकार ‘बॉलरूम डान्स’ असाच आहे. इतक्या वर्षांनी आता बॉलरूम डान्सिंगबद्दल कुतूहल आणि प्रेम वाढू लागलं आहे.
बॉलरूम डान्सिंग हा शब्द मुळात ‘बॉल’ या शब्दापासून बनवला आहे. या शब्दाचं मूळ Ballare या लॅटिन शब्दात आहे. लॅटिन भाषेत याचा अर्थ आहे ‘नृत्य करणे’ असा. ज्या खोलीत पूर्वी ही नृत्यं केली जात होती त्या रूमला बॉलरूम असे संबोधले जायचे. त्यावरूनच डान्सचं नाव आले. हल्ली पंचतारांकित हॉटेल्समध्ये बॉलरूम नावाने हॉल दिसतात, ते याच परंपरेतून.
बॉलीवूड, बेली डान्सिंग, हिप-हॉप ही नृत्यं असोत किंवा शास्त्रीय नृत्य असो.. हे प्रकार आपल्या देशात ज्या प्रमाणात जनमानसात पसरले आहेत त्या तुलनेत ‘बॉलरूम डान्सिंग’ फार कमी लोकांना माहिती आहे. सर्व बॉलरूम डान्सिंग स्कूल्सनी या शैलीतील नृत्यांचा प्रसार करण्याचे काम करायला हवे. भारताच्या सांस्कृतिक नृत्य परंपरेत लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य किंवा काही एकल नृत्याचे प्रकार रुजू आहेत. परंतु पूर्णपणे परकीय शैलीतील आणि विदेशी मुळे असलेले बॉलरूम डान्सिंग हे प्रकरण पाश्चिमात्य नृत्य म्हणून आपण चार हात लांबच ठेवले होते. हे नृत्य भारतीय संस्कृतीच्या जवळचे नाही. आपल्या मनातल्या काही पारंपरिक संकल्पनांना, रूढी आणि कल्पनांना सोडून आहे. त्यामुळेही त्याचा प्रसार व्हायला आत्ताचा काळ उजाडला असावा. अजूनही बॉलरूम डान्सिंग हे नृत्य मेट्रो सिटीपुरतंच मर्यादित आहे. काही बोटांवर मोजण्या इतक्याच कॉस्मोपॉलिटन शहरामधले लोक बॉलरूम डान्सिंगसाठी कंफर्टेबल असतात. गावांमध्ये, खेडय़ांमध्ये, छोटय़ा शहरांमध्ये, अगदी मुंबईच्या काही उपनगरांमध्येदेखील अजून बॉलरूम डान्स म्हणजे काय? असा प्रश्न विचारला जातो. एक नृत्यशैली म्हणून त्याकडे पाहिलं जात नाही.
खरं तर बॉलरूम डान्स हा अनेक नृत्य प्रकारांचा एक समूह आहे. इसवी सनाच्या १८ व्या शतकापासून त्याची उत्क्रांती झाल्याचं आढळतं. अजूनही बॉलरूम डान्सिंगच्या नवनव्या शैली, फेरबदल, रचना विकसित होत आहेत. बॉलरूम डान्सिंगमध्येदेखील आपल्याकडच्या घराणेशाही सदृश भेद आहेत. म्हणजेच याचे काही प्रकार आहे, साधारणत: हे भेद किंवा क्लासिफिकेशन बदलत नाहीत. परंतु प्रचलित भेदांमध्ये थोडेफारच फरक आतापर्यंत झाले आहेत.
अनेक वेबसाइट्सवर वेगळे भेद दिले आहेत, परंतु या सगळ्या माहितीचा सारांश पाहिला तर बॉलरूम डान्सिंग पाच मूळ प्रकारांमध्ये विभागता येतील. त्याचे विश्लेषण सोबतच्या चौकटीत वाचा.
बॉलरूम डान्सिंगचे काही प्रकार पुणे- ठाणे- मुंबईसारख्या शहरांत सध्या एकदम ट्रेण्डमध्ये येताहेत. फिटनेस डान्सिंगच्या दृष्टिकोनातूनही त्याकडे पाहता येईल. हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीच्या स्टॅटिस्टिक्स्प्रमाणे १५५ पाऊंड वजनाच्या माणसाने एक तास २५ मिनिटे बॉलरूम नृत्य केल्यावर ५०० कॅलरीज् बर्न होतात.
बॉलरूम डान्सिंगविषयी अजून बरेच काही बोलायचेय, पण ते पुढच्या भागात.
vn77rr
   

layoffs in 2024 leading it companies cutting jobs in year 2024
‘आयटी’ कंपन्यांच्या मनुष्यबळात घट; देशातील आघाडीच्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रोचा समावेश
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच