आरोग्याच्या दृष्टीने नृत्यकला उपयुक्त असल्याचं तत्त्वज्ञान जुनं असलं तरीही नृत्याचा उपयोग फिटनेस एक्झरसाइझ म्हणून करण्याचा ट्रेण्ड तसा नवीनच. त्यातही जगभरातले अनेक नृत्यप्रकार एकत्र करून हल्ली डान्स अ‍ॅण्ड फिटनेस रुटीन बांधलं जातंय. त्यातले लॅटिन अमेरिकन नृत्यप्रकार विशेष लोकप्रिय आहेत. त्याविषयी..

लॅटिन अमेरिकन नृत्यप्रकार फिटनेस एक्झरसाइज म्हणून सध्या विशेष लोकप्रिय आहेत. त्यातही झुंबाचा क्रमांक वरचा लागतो. याशिवाय बचाटा, मेरेंगे, साल्सा, जाइव असे इतर नृत्यप्रकारही तरुणाई आत्मसात करते आहे. या लॅटिन अमेरिकन ठुमक्यांविषयी..

Untitled-3डान्स पे चान्स मारले म्हणत सध्या नृत्याकडे फिटनेसच्या अंगानं हल्ली पाहिलं जातंय. बॉलीवूड, मसाला भांगडा, कंटेम्पररी, हिप-हॉप, लोिपग-पोिपग या प्रकारांबरोबरच लॅटिन अमेरिकन डान्स प्रकारांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चाललेली आहेत. लॅटिन अमेरिकन नृत्याचे प्रकार म्हटले की, पहिल्यांदा साल्सा हा प्रकार डोळ्यासमोर येतो. साल्सा हा मूळ क्युबा या देशातून उगम पावलेला नृत्यप्रकार आहे. युरोपीय आणि आफ्रिकी संस्कृतीशी नातं सांगणारं संगीत आणि ताल परंपरेच्या प्रभावातून साल्साचा जन्म झाला, असं मानलं जातं. आज जगभरात साल्सा लोकप्रिय झालेला आहे. भारतातही मुंबई, पुण्यात साल्सा शिकवणाऱ्या अनेक डान्स अ‍ॅकॅडमी दिसतात. हल्ली फिटनेस रुटीन म्हणून साल्सा करणाऱ्यांची संख्या वाढतेय.
 आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या गाजत असलेल्या पाच लॅटिन नृत्य प्रकारांमध्ये ‘जाइव拀 हा प्रकारदेखील येतो. िस्वग नृत्याचा हा प्रकार भारतात अजून नवा आहे, पण अपरिचित नाही. भारतात हा नृत्यप्रकार कॅथलिक लोकांनी प्रचलित केला. साल्साच्याही पूर्वीचा हा नृत्यप्रकार आहे. हा नृत्यप्रकार १७६ बीट प्रति मिनिट किंवा काही ठिकाणी १२८ ते १६० बीट प्रति मिनिट इतक्या जलद गतीने सादर केला जातो. नी लििफ्टग, बेंिडग आणि कमरेच्या हालचाली यावरच या नृत्याचं सौंदर्य अवलंबून असतं. आपल्या कॅलरीज बर्न व्हायला, शरीराचा समतोल राखण्यासाठी आणि स्नायूंना मजबूत करण्यासाठी हा प्रकार उपयोगी ठरतो.
सध्या आणखी एका नृत्यप्रकाराचा बोलबाला झालाय- बचाटा. बचाटा हा नृत्य प्रकार लॅटिन अमेरिकेत पारंपरिक नृत्यप्रकार आहे. जोडीनं करायचं हे नृत्य आहे. एकमेकांच्या जवळ येऊन करायचा हा प्रकार. त्यामुळे पूर्वी केवळ नवरा-बायको करीत असत. बाहूंच्या एकत्रित हालचालींतून हा नृत्यप्रकार साधला जातो. यामध्ये पुष्कळशा मूव्हमेंट कंबर आणि पायांच्या लयबद्ध हालचालींवर केल्या जातात. पॅशन, इमोशन आणि कनेक्शन यांच्या संगमातून हे नृत्य साधलं जातं.
मेरेंगे हा डोमिनिक गणराज्याचं पारंपरिक लोकनृत्य आहे. ठेकेदार पारंपरिक संगीत हा या नृत्याचा आत्मा आहे. यामध्ये देखील विविध प्रकार आहेत. बॉलरूम मेरेंगेमध्ये जोडपी आपल्या नाचण्याची गती कमी ठेवून छोटय़ा छोटय़ा स्टेप्स करतात. एकमेकांभोवती तसंच नृत्य करता करता फिरता येतं. फिगर मेरेंगेमध्ये प्राथमिक आणि इतर अ‍ॅडव्हान्स स्टेप्सचा मिलाफ होतो आणि एकटय़ाने गोल फिरले जाते. या स्टेप्स मुद्दाम छोटय़ा ठेवल्या जातात, जेणेकरून वळण हळुवार पण तेवढंच ताकदीचं होतं.
हे सगळे नृत्यप्रकार अचानक कसे ट्रेण्डमध्ये आले, त्याबद्दल विचारल्यावर ‘डिफरंट स्ट्रोक्स स्टुडिओ拀चे संचालक आणि प्रसिद्ध नृत्य प्रशिक्षक नकुल घाणेकर म्हणाले, ‘साल्सा आणि बचाटाला सध्या मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. जाइव आणि मेलेंगे हे तुलनेने नव्याने रुळणारे नृत्यप्रकार आकारणं असतात. साल्सा या प्रकाराला गेल्या १० वर्षांत हळूहळू लोकप्रियता मिळत होती. त्याची तरुणाईमध्ये असणारी क्रेझ दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसते आहे. वॉकिंग एक्झरसाइजपेक्षा जास्त फायदा या नृत्यांमधून मिळतो. फिटनेस आणि कॅलरी बर्निग असं दुहेरी ध्येय साध्य होऊ शकतं. बचाटा हा क्लोज डान्स प्रकार असल्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये तो जास्त लोकप्रिय नाही. कुठलाही एखादा नृत्यप्रकार लोकप्रिय होणं किंवा पूर्णत: दुर्लक्ष केलं जाणं याला संस्कृती, नृत्याचा बाज आणि शिक्षक ही जबाबदार आहेत.’
हे सर्वच लॅटिन अमेरिकन नृत्यप्रकार जलद असल्यामुळे हृदयाचे ठोके प्रति मिनिट ८० ते १२० या दराने वाढतात. मोठय़ा प्रमाणावर कॅलरीज कमी होतात. जिममध्ये जाऊन घाम गाळण्यापेक्षा नृत्यातील आनंद घेता घेता वजनही कमी होतं. लॅटिन अमेरिकन नृत्याचे बहुतेक सगळे प्रकार ‘ग्रुप एक्झरसाइज拀 म्हणून करण्याचे आहेत. त्यामुळे  मित्र-मैत्रिणींसोबत मनमोकळ्या वातावरणात हे करता येतात. नृत्याच्या जलद आणि लवचिक हालचालींमुळे व्यायाम आणि स्ट्रेस मॅनेजमेंट दोन्ही साधलं जातं. आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढते. शरीर आणि पायांना आकार मिळतो. लॅटिन अमेरिकन नृत्य ही एक कलात्मक अभिव्यक्ती आहे, त्याचबरोबर फिटनेससाठी अत्यंत उत्तम असा पर्याय आहे. त्यामुळेच ते ट्रेण्डी एक्झरसाइज रुटीनमध्ये वरच्या स्थानावर पोचलेय.