नुकतेच सगळे फॅशन शोज पार पडलेत. समर ट्रेण्ड्सच्या चर्चा रंगू लागल्यात. पण कितीही महागडा, फॅशनेबल ड्रेस घ्या, घातल्यावर मात्र ‘कुछ तो कम है’, ही भावना राहतेच. हे ‘कुछ कम’ म्हणजे मेकअप आणि अ‍ॅक्सेसरीज. राइट ड्रेसबरोबर राइट अ‍ॅक्सेसरीज असणं सध्या मस्ट आहे. म्हणूनच या सीझनच्या हिट अ‍ॅक्सेसरीजचे ट्रेण्ड्स थेट रॅम्पवरून तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

हॅट्स
हेअर अ‍ॅक्सेसरीजमध्ये हॅट्सला डिमांड आहे. एक तर उन्हाळ्याच्या दिवसात हॅट उपयोगी असतेच. पुन्हा ती ट्रेण्डमध्ये आहे. स्मॉल टू बिग कोणत्याही शेपची आणि साइजची हॅट तुम्ही घालू शकता.

सनग्लासेस
सनग्लासेसमध्ये राउण्डेड फ्रेम्स पाहायला मिळत आहेत. यामुळे फंकी आणि टॉमबॉयिश लुक मिळतो. फ्रेम्समध्ये एक्सपिरीमेंट करण्यासाठी यंदा बराच वाव आहे.
 

स्काफ्र्स
जर तुम्ही अ‍ॅक्सेसरीजचे फार शौकिन नसाल तर स्कार्फ घेऊन तुमचा लुक कम्प्लिट करू शकता. ट्रेण्डी, फंकी स्कार्फ या सीझनचे एक मुख्य वैशिष्टय़ आहे.

शूज
लाँग हिल्सपेक्षा यंदा डिझाइनर्सनी फ्लॅट ग्रॅडिएटर्सना पसंती दिली आहे. ‘ईझी टू वेअर अ‍ॅण्ड कम्फर्टेबल टू वॉक’ असा काहीसा उद्देश यंदा शूजसंबंधी वापरला गेला आहे. हिल्ससाठीसुद्धा क्लॉग्ज, वेजेस आणि प्लॅटफॉर्म हिल्स, चंकी हिल्स या हिल्सना पसंती देण्यात आली होती.

हॅण्डबॅग्ज
गेल्या सीझनमध्ये ट्रेंडी ठरलेल्या मोठय़ा टोट बॅग्जच्या ऐवजी यंदा डिझाइनर्सनी िस्लज बॅग्ज आणि क्लचेसना पसंती दिली आहे. फंक्शनल ड्रेसवर शोभतील अशा बॉक्स बॅग्ज, एम्ब्रॉयडर बॅग्ज ट्रेण्डमध्ये आहेत.

ज्वेलरी
ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी पुन्हा ट्रेण्डमध्ये आली आहे. यंदा ड्रेस एखाद्या कॅनव्हासप्रमाणे प्लेन सटल रंगाचा ठेवून ज्वेलरीचा उपयोग इनोव्हेटिव्ह आणि एक्सपिरीमेंटल पद्धतीने करण्याकडे डिझाइनर्सचा कल होता.
लाँग ईअरिरग्स पुन्हा ट्रेण्डमध्ये आल्या आहेत. स्ट्रेटमेंट नेकपिसेसची जागा आता लाँग पेण्डंट्स घेऊ लागले आहेत.

संकलन : मृणाल भगत
डिझाइन : संदेश पाटील