पुणे-मुंबई सोडता इतर शहरंसुद्धा स्ट्रीट शॉपिंगमध्ये मागे नाहीत बरं का! नाशिकमधली जुनी महानगरपालिका आणि संत गाडगेबाबा मेन रोडवर कपडे, चप्पल आणि बॅग्सच्या असंख्य व्हरायटी मिळतात. किंमतही ३०० ते ३५० रुपयांपर्यंत असते. मजबूत बार्गेनिंग करायला इथे वाव असतो. औरंगाबादमधला नवा मोंडा परिसर असा स्ट्रीट शॉपिंगसाठी प्रसिद्ध आहे. इतर दिवसांपेक्षा रविवारी भरणाऱ्या बाजाराच्या किमती कमी असतात. नागपूरला सीताबर्डी, महाल या भागांमध्ये स्ट्रीट शॉपिंगची संधी मिळते. ५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये लेटेस्ट टेण्डचे कपडे मिळतात. इथेही व्यवस्थित बार्गेनिंगला स्कोप असतो.
पुण्याला सध्याचा कॉस्मोपॉलिटन चेहरा मिळण्याआधी तिथलं हक्काचं शॉपिंग डेस्टिनेशन होतं तुळशीबाग. पुणं बदललं पण तुळशीबाग फारशी बदललेली नाही. त्यामुळे आता नव्या पुण्यातही अनेक फॅशनेबल स्ट्रीट मार्केट उदयाला येत आहेत. शॉपिंगप्रेमींसाठी पुण्याच्या लक्ष्मी रोडपासून ते कोरेगाव पार्कपर्यंतच्या गल्लयांमध्येसुद्धा खूप काही दडलेलं आहे. पुण्यातल्या शॉपिंग स्ट्रीटचं गाईड देत आहोत.

फग्र्युसन कॉलेज रोड आणि हाँगकाँग लेन
काय मिळतं : कपडे, चपलांपासून ते अ‍ॅक्सेसरीजपर्यंत सर्व काही
किंमत : २०० ते २००० रुपये
बार्गेनिंग : शक्यतो बार्गेनिंगच्या
फंदात न पडणेच योग्य

कँप आणि फॅशन स्ट्रीट
काय मिळतं : लेटेस्ट ट्रेण्डचे पार्टीवेअर आणि कॅज्युअल कपडे, फूटवेअर
किंमत : १०० ते १००० रुपयांपर्यंत
बार्गेनिंग : इथे तुमचे बार्गेनिंग स्किल वापरून किंमत निम्म्यापर्यंत आणू शकता.

कोरेगाव पार्क
काय मिळतं : ज्वेलरी, फंकी झोलाज आणि ओशो चप्पल
किंमत : २०० ते ५०० रुपयांपर्यंत
बार्गेनिंग : इथे बार्गेनिंग करून किंमत निम्म्यापर्यंत खाली आणू शकता, पण बाजूला फॉरेनर असेल तर विचार सोडून द्या.

तुळशीबाग आणि लक्ष्मी रोड
काय मिळतं : काय नाही मिळत ते विचारा. लग्नाच्या खरेदीसाठी तर तरुणींसाठी हक्काचं ठिकाण.
किंमत : ५ ते ५००० रुपयांपर्यंत
बार्गेनिंग : पूर्वी व्हायचं, पण आता इथेसुद्धा ‘फिक्स रेट’चे बोर्ड झळकतात.
स्पेशल टिप्स : सध्या इथल्या तरुणांची गर्दी कमी झाली आहे, पण तरुण गायब नक्कीच झाले नाहीत.