उन्हाळ्यात त्वचा काळवंडणे, घामोळं येणे, खाज सुटणे असे अनेक त्रास उद्भवू शकतात. यापासून बचाव करायचा असेल तर उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी, याबाबत तज्ज्ञांनी दिलेला सल्ला…

फोटोग्राफी, इव्हेंट मॅनेजमेंट, पत्रकारितेसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांत असणाऱ्या स्त्रीला कामासाठी सतत फिरावं लागतं. त्यामुळे सूर्यकिरणांच्या संपर्कात त्वचा आल्यामुळे मॉइश्चर कमी होतं. त्यामुळे त्वचा काळवंडणे, प्रीमॅचुअर एजिंग अशा समस्या निर्माण होतात. बऱ्याचदा चेहरा, मान, पाठ, हात आणि पाय तीव्र सूर्यकिरणांच्या संपर्कात आल्याने तिथली त्वचा काळवंडल्याचं आढळून येतं. चप्पल घातल्यानंतर पायाचा जो भाग उघडा पडतो, तिथली त्वचा जास्त काळवंडते. अशा प्रकारचं टॅनिंग त्वचेवर दिसत असेल तर काय करावं, याविषयी त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अपर्णा संथानम यांनी दिलेल्या टिप्स..

* उन्हापासून संरक्षण करण्यासाठी फक्त एसपीएफ पुरेसं नाही. तुमची त्वचा सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवण्यासाठी डय़ुअल स्पेक्ट्रम किंवा ब्रॉड स्पेक्ट्रम सन प्रोटेक्शन लोशनचा वापर करा.
* निवड केल्यास त्वचा काळवंडणं तुम्ही टाळू शकता.
* बऱ्याच जणी सन प्रोटेक्शन लोशन फक्त चेहऱ्यावरच लावतात. शरीराच्या ज्या इतर भागांवर सूर्यकिरणे पोहोचतात अशा भागांची काळजी घेण्याचीही गरज असते हे लक्षात घेतलं पाहिजे. चेहऱ्याबरोबरच मान, पाठ, दंड, हाताच्या पाठचा भाग, पाय या अवयवांचंही सूर्यकिरणांपासून संरक्षण केलं पाहिजे.
* घराबाहेर जाण्यापूर्वी १५-२० मिनिटं आधी त्वचेवर सारख्या प्रमाणात सनस्क्रीन लावले गेलं तर जास्त उपयुक्त ठरतं. त्यामुळे त्वचा काळवंडत नाही.
* रोज पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याबरोबरच कलिंगड, टोमॅटो, गाजर, काकडी असे पाण्याचा अंश जास्त असलेले पदार्थ खाल्ले गेले पाहिजेत.
* मेडिटेशन आणि दीर्घ श्वसनामुळे मन शांत होतं. रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होतं. त्यामुळे त्वचेवर एक वेगळंच तेज येतं. दररोज ५ मिनिटे दीर्घ श्वसन केल्यामुळे त्वचा टवटवीत राहते.
(डॉ. अपर्णा संथानम या िहदुस्तान लिव्हरमध्ये स्किनकेअर एक्स्पर्ट म्हणून कार्यरत आहेत.)