गणपती विसर्जनासाठी नेहमीप्रमाणे भागशाळा मैदान, नेहरू मैदान, प्रगती महाविद्यालयाजवळ, पंचायत बावडी येथे कृत्रीम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. जल प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. मनोहर अकोले यांनी केले आहे.
रोटरी क्लब डोंबिवली मिडटाऊन आणि कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे हा उपक्रम दरवर्षी राबवण्यात येतो. नागरिकांचा दरवर्षी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो.
या माध्यमातून गणेश भक्तांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याचे प्रकल्प प्रमुख डॉ. नितीन जोशी यांनी सांगितले.ह्ण