सभा, संमेलन, संस्कृती आणि सन्मान अशा चार सूत्रांमधून गुंफलेला साहित्य-संगीताचा अजब मिलाफ असलेला ‘लिट ओ फेस्ट’ हा साहित्य महोत्सव जे. जे. कला महाविद्यालयाच्या प्रांगणात रंगणार आहे. २८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या साहित्य महोत्सवात हिंदी, मराठी, उर्दू अशा भाषांमधील साहित्यासह या भाषांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविधांगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
‘ई बिझ एंटरटेन्मेट’च्या वतीने मुंबईत पहिल्यांदाच या आगळ्यावेगळय़ा ‘लिट ओ फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. सभा म्हणजेच विविध विषयांवरचे परिसंवाद आणि कार्यशाळा, संमेलन म्हणजे भाषिक साहित्यावर आधारित प्रदर्शन, संस्कृती म्हणजे त्यावर आधारित कार्यक्रम आणि गुणिजनांचा सत्कार अशा चार भागांमध्ये या ‘लिट ओ फेस्ट’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महोत्सवाच्या संचालक स्मिता पारिख यांनी दिली. महोत्सवाच्या सुरुवातीलाच हिंदी आणि मराठी भाषेपुढच्या समस्यांचा वेध घेणारे परिसंवाद होणार आहेत. ‘हिंदी किती लोकप्रिय?’, ‘आओ हिंदी के सपने देखे’, ‘दलित साहित्य’ असे परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. याशिवाय, उर्दू भाषा आणि त्यातील साहित्याचा वेध घेणारा ‘लफ्जी-ए-बयान’ हा परिसंवादही रंगणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Feb 2015 रोजी प्रकाशित
जे.जे.च्या प्रांगणात ‘लिट ओ फेस्ट’ रंगणार
सभा, संमेलन, संस्कृती आणि सन्मान अशा चार सूत्रांमधून गुंफलेला साहित्य-संगीताचा अजब मिलाफ असलेला ‘लिट ओ फेस्ट’ हा साहित्य महोत्सव जे. जे.
First published on: 27-02-2015 at 06:58 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lit o fest in j j school of art