सातत्याने वादग्रस्त राहिलेले शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या विरोधात कोपरखैरण्यातील एका तेवीसवर्षीय तरुणीने गेल्या तीन वर्षांपासून शारीरिक शोषण केल्याची तक्रार सीबीडी पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणी सीबीडी पोलिसांनी चौगुले यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या एका सहकाऱ्याविरोधात त्या तरुणीवर पाळत ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली. मात्र चौगुले यांना अद्याप अटक करण्यात आलेले नाही.
कोपरखैरणे येथे राहणाऱ्या या पीडित तरुणीने चौगुले यांनी तिला व तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत गेल्या तीन वर्षांपासून लोणावला, सीबीडी आणि गोवा आदी ठिकाणी  अतिप्रंसग केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच चौगुले यांचा कोपरखैरणे येथे राहणारा सहकारी तानाजी शंकर सुर्वे हा तिच्यावर सातत्याने पाळत ठेवून असल्याचा आरोप पीडित तरुणीने केला होता. या प्रकरणी तानाजी सुर्वे याला अटक करण्यात आल्याची माहिती सीबीडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीरा बनसोडे यांनी दिली आहे. चौगुले यांना अद्याप अटक करण्यात आलेले नाही. सातत्याने निवडणुकीच्या काळात माझ्याविरोधात षड्यंत्र रचले जाते, आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत हेदेखील षड्यंत्र रचण्यात आल्याचे स्पष्टीकरण विजय चौगुले यांनी दिले आहे. या प्रकरणी पोलिसांनीदेखील सावध भूमिका घेतली असून या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न केले असता, या गुन्हाची कोणतीही माहिती देण्यास वरिष्ठांनी मनाई केली असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत होते.

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
Accused in gang rape case
सामूहिक बलात्कार प्रकरणातील नऊ वर्ष पसार असलेल्या आरोपीला अटक
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा