देशातील भाजप सरकारने जनतेच्या हितसाठी आठ कलमी कार्यक्रम देशभर राबवला आहे. त्याची माहिती आणि व्याप्ती नागरिकांना देण्यासाठी भाजपाच्या वतीने देशभर वार्डस्तरावर २६ ते ३१ मे या कालावधीत जनकल्याण पर्व उपक्रम राबवला जाणार आहे. नवी मुंबईतही हा उपक्रम राबवणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष सी.व्ही.रेड्डी आणि प्रदेश सचिव वर्षां भोसले यांनी दिली.
अटल पेन्शन योजना, पंतप्रधान विमा योजना, बेटी बचाव मोहीम, स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, पंतप्रधान ग्राम सडक योजना, बलशाली भारत आदी योजना देशभर भाजपप्रणीत केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत.
या योजनांची माहिती आणि व्याप्ती सामान्य जनतेला घरोघरी जाऊन देण्यात येणार आहे. नवी मुंबईत प्रत्येक वॉर्डातील नागरी वसाहतीमध्ये जावून चौक सभा घेऊन सरकारच्या आठ कलमी कार्यक्रमाची माहिती दिली जाणार आहे. त्यांनतर १ जूनपासून ३० जूनपर्यंत नवी मुंबई भाजपाने जे मिस कॉलच्या माध्यमातून दोन लाख सभासद नोंदणी केली आहे.
त्यांना प्रत्यक्ष भेटून पक्ष कार्यासाठी सक्रिय मोहीम राबवली जाणार आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.