मला बाइक रायडिंगचे प्रचंड वेड आहे. त्यातूनच मी दोन वर्षे पैसे जमवून गेल्या वर्षी ६ सप्टेंबरला रॉयल एन्फिल्ड थंडरबर्ड ३५० ही बुलेट घेतली. एवढी मोठी बाइक मी घेतेय म्हटल्यावर माझ्या आईला प्रचंड टेन्शन आले होते. मात्र, माझ्या हट्टापुढे तिने नमते घेतले. आता बुलेटवर जेव्हा माझी आई बसते तेव्हा तिला माझा अभिमान वाटतो. मित्रमंडळीही त्यामुळे फेमस झाली आहेत. मी जेव्हा बुलेट ड्राइव्ह करत असते त्यावेळी माझ्याकडे कौतुकाने पाहिले जाते. बाजूने इतर कोणी बुलेटवाला जात असेल तर त्यांचाही सेकंड लूक मला मिळतोच. माझ्या आईला माझा विशेष अभिमान वाटतो. कारण तिचेही असेच स्वप्न होते की आपण बुलेट चालवावी वगैरे. मात्र, तिचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मी एकटीने बराच प्रवास केला आहे, बुलेटवरून. मुंबई ते गोवा हा त्यातला सर्वात संस्मरणीय प्रवास. गोव्यातील रॉयल एन्फिल्ड रायडरमॅनिया या फेस्टिव्हलला उपस्थिती लावली होती.

– शाल्विनी कोतकर, मीरा रोड, मुंबई

या सदरासाठी माहिती पाठवा :  ls.driveit@gmail.com