हिंदी चित्रपट अभिनेता व निर्माता आदित्य पांचोली विरोधात मुंबई पोलिसांनी बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Mumbai Police files an FIR of rape against actor-producer Aditya Pancholi. pic.twitter.com/oE5XtAnNKd
— ANI (@ANI) June 27, 2019
वर्सोवा पोलिसांनी पांचोली विरोधात कलम ३७६, ३२८,३८४, ३४१, ३४२, ३२३, ५०६ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरण १० वर्ष जुनं असल्यामुळे आदित्य विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, त्याच्याविरूद्धचे पुरावे गोळा करणं हे कठीण असणार आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. मुंबई पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहे. पीडितेने केलेल्या तक्रारीमध्ये आदित्य पांचोलीने अनेकदा तिच्यावर बलात्कार केल्याचे म्हटले आहे. शिवाय याप्रकरणी तिने पांचोलीविरुद्ध लिखीत तक्रारही नोंदवली होती.
काही दिवसांपूर्वीच आदित्य पांचोलीने हिंदी चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत व तिची बहिण रंगोली चंदेल यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. यानंतर न्यायालयाने या दोघींना याप्रकरणी न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. या अगोदरही आदित्य पांचोली अनेक वादात सापडले आहेत.