पूजा चव्हाण प्रकरणाला सहा महिने होत आले. त्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही पोलिसांकडून करण्यात आली नाही. ही घटना थांबत नाही. तोवर आता यवतमाळ येथील महिलेकडे शिवसेनेचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार संजय राठोड यांनी शरीर सुखाची मागणी केल्याची घटना समोर आली आहे. मात्र संजय राठोड यांनी आरोप फेटाळून लावले आहे. पण याही प्रकरणात दुसरे तिसरे कोणी नसून संजय राठोडच आहेत. त्यामुळे अशी घाण खालच्या आणि वरच्या सभागृहात नकोच, अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

यावेळी चित्रा वाघ म्हणल्या की, “काल यवतमाळमध्ये एका महिलेने शिवसेना आमदार संजय राठोड यांच्यावर एका पत्रातून आरोप केले आहेत. की आपल्या नवऱ्याला परत नोकरीवर घेण्यासाठी शारीरिक सुखाची मागणी केली आहे. संजय राठोड यांनी हा आरोप टीआरपी न्यूजसाठी असेल असं म्हटले आहे. हा सत्तेचा माज नाही तर काय आहे. नावाच साधर्म्य आहे, असे संजय राठोड म्हणत आहेत. पण त्या महिलेने थेट संजय राठोड यांच नाव घेतलं आहे. त्यामुळे या प्रकरणात संजय राठोड जबाबदार आहेत”

राज्यातील महिलांना आवाहन 

पूजा चव्हाण प्रकरणातील फॉरेसिक रिपोर्ट पुढे का आणला नाही. त्यात काय झाले. त्याबद्दल साधी एफआयआर नाही करू शकले. आम्ही त्या प्रकरणावर देखील अखेरपर्यंत आवाज उठविणार असल्याचे चित्रा वाघ यांना सांगितले. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, दोन्ही प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. त्या पार्श्वभूमीवर रक्षा बंधनाचे औचित्य साधत, माझं महाराष्ट्रातील माता भगिनाना विनंती आहे की, रक्षाबंधन निमित्ताने मुख्यमंत्र्यांना एक धागा पाठवून आमची सुरक्षा करा, असे आवाहन राज्यातील महिलांना त्यांनी केले आहे.

गृहमंत्र्यांनी लक्ष घालून कारवाई करायला पाहिजे 

पूजा चव्हाण आणि यवतमाळ येथील महिलेच प्रकरण लक्षात घेता. गृहमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून कारवाई करायला पाहिजे. मात्र गृह खात म्हणजे आंधळ दळतय आणि कुत्र पिट खातय असं झाले आहे. सत्तेतील तिनी पक्ष एकमेकांची पाठ थोपटण्यात मग्न असल्याचे म्हणत चित्रा वाघ यांनी गृहमंत्र्यांवर टीका केली आहे.