पाकिस्तानचा क्रिकेटर कामरान अकमल आपल्या इंग्रजीमुळे नेहमीच चर्चेत असतो. याआधी तो चुकीच्या इंग्रजीमुळे तो ट्रोल झाला आहे. आताही तो पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी एका गोष्टीमुळे ट्रोल झाला. कामरान अकमलने १४ ऑगस्टला पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कामरानने इंग्रजीमध्ये या शुभेच्छा दिल्या, याच कारणामुळे त्याची सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली जात आहे.

कामरानने आपल्या ट्विटर हँडलवर स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या, पण त्याने ‘इंडिपेंडन्सचे’ स्पेलिंग चुकवले. ट्रोलर्सनी कामरानला खूप ट्रोल केले आहे. यापूर्वी त्याचा भाऊ उमर अकमल देखील सोशल मीडियावर त्याच्या इंग्रजीबद्दल ट्रोल झाला आहे.

भारताच्या एक दिवस पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. अशा स्थितीत पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि इतर सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. कामरान अकमल एप्रिल २०१७ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. असे असले, तरी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आहे. घरगुती क्रिकेटमध्ये सक्रिय राहण्याव्यतिरिक्त, अकमल सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे.

 

 

 

हेही वाचा – १५ ऑगस्ट : महेंद्रसिंह धोनीच्या ‘स्टाइल’मध्ये विराट कोहलीचीही निवृत्ती?

कामरान अकमलची कारकीर्द

कामरान अकमल पाकिस्तान क्रिकेट संघाकडून २००२ ते २०१७ या काळात तीनही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्याने पाकिस्तान संघासाठी यष्टीरक्षक-फलंदाजाची भूमिका बजावली आहे. पाकिस्तानकडून खेळताना कामरानने ५३ कसोटी सामन्यांमध्ये २६४८ धावा केल्या. त्याचबरोबर त्याने १५७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३२३६ धावा केल्या. अकमलने पाकिस्तानसाठी ५८ टी -२० सामनेही खेळले, ज्यात त्याने ९८७ धावा केल्या.