Tata Punch Micro SUV:  टाटा मोटर्सच्या कारला भारतीय बाजारपेठेत चांगलीच पसंती मिळत आहे. सध्या, Tata Nexon ही कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. ती दीर्घ काळापासून देशातील सर्वाधिक विकली जाणारी SUV आहे. तथापि, फेब्रुवारीमध्ये मारुती ब्रेझाने त्यास एक पायरी खाली ढकलले. टाटा नेक्सॉन बद्दल सर्वांना माहिती आहे पण टाटा मोटर्सची दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार कोणती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? ही कंपनीची सर्वात स्वस्त SUV आहे, जी तुम्हाला फक्त ६ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सर्वोत्तम फीचर्स देते. फेब्रुवारी महिन्यात या कारने विक्रीच्या बाबतीत ह्युंदाई क्रेटा आणि व्हेन्यू सारख्या वाहनांनाही मागे टाकले.

आम्ही ज्या कारबद्दल बोलत आहोत ती टाटा पंच एसयूव्ही आहे. फेब्रुवारी महिन्यात ही देशातील नववी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. त्याच वेळी, ह्युंदाई क्रेटा आणि व्हेन्यू त्यापेक्षा एक पायदान खाली राहिले. गेल्या महिन्यात टाटा पंच मायक्रो एसयूव्हीच्या ११,१६९ युनिट्सची विक्री झाली होती. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत त्याच्या विक्रीत १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी, Hyundai Creta च्या १०,४२१ युनिट्स आणि Venue च्या ९,९९७ युनिट्सची विक्री झाली.

(हे ही वाचा : धमाकेदार आॅफर! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर मोफत थायलंड फिरण्याची संधी, अन् ५ हजारांपर्यंत कॅशबॅक )

टाटा पंच किंमत

टाटा मोटर्सने नुकतीच या एसयूव्हीच्या किमतीत १०,००० रुपयांची वाढ केली आहे. या मायक्रो एसयूव्हीची किंमत ६ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ९.४७ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम दिल्ली) जाते. हे चार ट्रिममध्ये विकले जाते. यामध्ये जास्तीत जास्त ५ लोक बसू शकतात. टाटाच्या या मायक्रो एसयूव्हीमध्ये ३६६ लीटरची बूट स्पेस देण्यात आली आहे.

टाटा पंचची वैशिष्ट्ये

टाटा पंचच्या वैशिष्ट्यांच्या यादीमध्ये ७-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेल, ऑटो एअर कंडिशनिंग, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि क्रूझ कंट्रोल यांचा समावेश आहे. सुरक्षेसाठी, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, मागील डिफॉगर, मागील पार्किंग सेन्सर्स, एक मागील दृश्य कॅमेरा आणि ISOFIX अँकर प्रदान केले आहेत. कारची स्पर्धा महिंद्रा KUV100, मारुती इग्निस, Nissan Magnite आणि Renault Kiger यांच्याशी आहे.