बांधावरील सिताफळाचे झाड तोडल्याच्या कारणातून लाकडी दांडययाने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना तासगाव तालुययात विसापूर येथे घडली. या खूनप्रकरणी एका महिलेसह चौघाविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तासगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.या हल्ल्यात संदीप प्रकाश माळी (वय ३५) हा काल गंभीर जखमी झाला. खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. संदीपने बांधावरील सिताफळाचे झाड तोडल्याच्या कारणावरून हा झाला होता. या प्रकरणी राजेंद्रमाळी, सुरेखा माळी, रोहित उर्फ संकेत माळी व राहुल उर्फ अमित माळी या चौघाविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिव्यांग मुलीची विहीरीत टाकून हत्या
दिव्यांग व अपंग असलेल्या श्रीदेवी कोळी (रा. कुरळप) या चार वर्षाच्या मुलीला पिता आण्णाप्पा कोळी यांने विहीरीत टाकून हत्या केली. मुलगी अपंग व मतीमंद असल्याने सांभाळ करण्यास कंटाळा आल्याने तिला घरातून नेउन रत्नाबाई मेतुगडे यांच्या विहीरीत टाकले. त्यातच तिचा मृत्यू झाला.या प्रकरणी संशयिताविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.