सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २६ मार्च रोजी घेण्यात आहे. त्यासाठी १ लाख १९ हजार ८१३ उमेदवारांनी अर्ज केला असून, उमेवारांना त्यांच्या लॉग इनमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.

हेही वाचा >>>पुणे : मिळकतकराच्या ४० टक्के सवलतीसंदर्भात आज बैठक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मान्यतेने राज्य शासनातर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील उमेदवारांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) आयोजित करण्यात येते. यंदाची ३८ वी परीक्षा ही २६ मार्चला होणार आहे. महाराष्ट्र आणि गोव्यात मिळून १७ शहरांमध्ये या परीक्षेचे आयोजन केले आहे. या परिक्षेसाठीची प्रवेशपत्र १६ मार्चपासून उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध केली आहेत. तसेच आवश्यक त्या सुचनेसह प्रवेशपत्र उमेदवारांच्या नोंदणीकृत ई मेलवरही पाठवण्यात आले असल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव आणि सेटचे सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.

हेही वाचा >>>पुण्यात जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक, “पेन्शन आमच्या हक्काचं…” लिहिलेले बोर्ड कर्मचाऱ्यांच्या हाती

उमेदवारांनी https://setexam.unipune.ac.in या संकेस्थळावर जाऊन आपल्या लॉग इनमधून नोंदणी क्रमांकाद्वारे २६ मार्चपूर्वी प्रवेशपत्र डाऊनलोड करायचे आहे. प्रवेशपत्र आणि मूळ ओळखपत्राशिवाय उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांनी दोन तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे सेट विभागाने स्पष्ट केले.