High Blood Pressure Foods: उच्च रक्तदाब ही एक गंभीर आणि झपाट्याने वाढणारी आरोग्य समस्या आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे चुकीचा आहार, बिघडलेली जीवनशैली व सततचा ताण. जास्त मीठ खाणे, तळलेले व प्रोसेस्ड फूड (प्रक्रिया केलेले अन्न) जास्त खाणे, पुरेशी झोप न घेणे, शारीरिक हालचालींचा अभाव आणि मानसिक ताण या सगळ्या गोष्टी उच्च रक्तदाबाचा धोका वाढवतात.

एखादी व्यक्ती जर खूप दिवस तणावात राहत असेल आणि संतुलित आहार व नियमित व्यायामाकडे लक्ष देत नसेल, तर हळूहळू रक्तदाबाचे स्वरूप वाढते. वेळेत नियंत्रण न ठेवल्यास ही समस्या अनेक गंभीर आजारांचे कारण बनू शकते.

जर तुम्ही खूप दिवसांपासून उच्च रक्तदाबाने त्रस्त असाल आणि फक्त औषधांनीच रक्तदाबावर नियंत्रण ठेवत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, काही खास अन्नपदार्थ आहारात घेतल्याने तुम्ही रक्तदाबावर नियंत्रण ठेवू शकता.

प्रसिद्ध गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी असे ५ अन्नपदार्थ सांगितले आहेत, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. या अन्नपदार्थांचे वैज्ञानिक पुरावेदेखील आहेत, जे दर्शवतात की, हे अन्नपदार्थ उच्च रक्तदाब नियंत्रित करतात आणि हृदयाच्या आरोग्यातही सुधारणा करतात. चला तर मग पाहूया उच्च रक्तदाब असलेल्यांनी रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते अन्नपदार्थ घ्यावेत ते.

केळी

केळ्यामध्ये पोटॅशियम जास्त असते, जे मूत्रपिंडांना अतिरिक्त सोडियम बाहेर टाकायला मदत करते आणि त्यामुळे रक्तदाब कमी होतो.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम आणि फ्लॅवॅनॉल्स असतात, जे नायट्रिक ऑक्साईड तयार होण्यास मदत करून रक्तदाब कमी करतात.

बीट

बीटरूटमध्ये ऑरगॅनिक नायट्रेट्स असतात. शरीरामध्ये त्याचं रुपांतर नायट्रस ऑक्साइडमध्ये होतं ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

डाळिंब

अभ्यासातून दिसून आले आहे की, डाळिंब एंजिओटेनसिन-कन्व्हर्टिंग एन्झाइमचे प्रमाण कमी करून रक्तदाब कमी करते.

आले

आले नैसर्गिक कॅल्शियम चॅनल ब्लॉकरसारखे काम करते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

पण याचा खरंच फायदा होतो का?

क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. दीपाली शर्मा (सीके बिरला हॉस्पिटल, दिल्ली) म्हणाल्या की, हे अन्नपदार्थ खरोखरच प्रभावी आहेत.

केळ्यात पोटॅशियम जास्त असते, जे सोडियम संतुलित ठेवते आणि रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करते.

डार्क चॉकलेटमध्ये (किमान ७०% कोको असलेले) फ्लॅवॅनॉल्स असतात, जे नायट्रिक ऑक्साईड वाढवतात आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारतात.