scorecardresearch

अजय मिश्रा

अजय मिश्रा किंवा अजय मिश्रा टेनी (Ajay Mishra) हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील राजकारणी आहेत. ते १७ व्या लोकसभेतील खासदार आहेत. भारत सरकारच्या गृह मंत्रालयातील सध्याचे राज्यमंत्री आहेत.ते उत्तर प्रदेशातील खेरी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. अजय मिश्रा यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी जिह्यातील बनवीर पूर या गावात झाला. आपल्या गावी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कानपूरला जाऊन तेथील छत्रपती शाहू जी महाराज विद्यापीठाच्या ख्राईस्ट चर्च कॉलेज येथून विज्ञान शाखेची पदवी मिळवली.


पुढे त्यांनी डीएव्ही कॉलेज, कानपूर येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्थानिक पातळीवरील राजकारणामध्ये सहभाग घेतला. २०१२ मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशच्या १६ व्या विधानसभेच्या निघासन मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते तेथील आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये खेरी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली. ते भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. सप्टेंबर २०१४ मध्ये त्यांची ग्रामीण विकास स्थायी समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. जुलै २०२१ मध्ये मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ फेरबदलानंतर त्यांना गृह मंत्रालयातील राज्यमंत्रीपद मिळाले. अजय मिश्रा यांची राजकीय कारकीर्द मोठी असली तरी त्या दरम्यान त्यांचे नाव अनेक प्रकरणांमध्ये आले. नव्वदीच्या दशकात त्यांच्यावर काही गुन्हे होते. पुढे प्रभात गुप्ता केसमुळेही ते चर्चेत आले. त्यानंतर २०२०-२१ च्या शेतकरी आंदोलनामुळे अजय मिश्रा अडचणीत सापडले होते. सप्टेंबर २०२१ मध्ये आपल्या मतदारसंघाच्या एका कार्यक्रमाला अजय मिश्रा उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये काही शेतकरी आंदोलकांनी काळे झेंडे फडकवत निषेध दर्शवला. यावरुन त्यांना आंदोलकांना संबोधून ‘सुधरा नाहीतर तुम्हाला नीट सुधारु..


मला दोन मिनिट नाही लागणार तुम्हाला सरळ करायला’ असे वक्तव्य केले. त्यामुळे एकूणच वातावरण तापले. पुढे ३ ऑक्टोबर २०२१ यांनी अजय मिश्रा यांचे सुपुत्र आशीष मिश्रा यांनी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या एका शेतकरी आंदोलनामध्ये भरधाव गाडी चालवत नेली. यामध्ये चार शेतकरी आंदोलक आणि एका पत्रकाराचा मृत्यू झाला आणि काही आंदोलक जखमी झाले असे म्हटले जात होते. यावरुन प्रकरण आणखी पेटले. पोलिसांनी आशीष मिश्रा यांना अटक केली. पुढे अजय मिश्रा यांच्या अटकेची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. काहींनी त्यांना पदावरुन काढून टाकावे असेही म्हटले. पण त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही.


Read More
udayanraje bhosale
VIDEO : उदयनराजे भोसले कॉलर उडवतात, डान्स करतात, ही भाजपाची शिस्त आहे का? केंद्रीय मंत्र्यांना प्रश्न विचारताच…

अजय मिश्रा यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा हे प्रश्न उपस्थित करण्यात आले.

lakhimpur-6
“गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारलं, मोदींनी मिश्रांना मंत्रिपदावरून हटवावं”, ‘या’ भाजपा नेत्याची मागणी

भाजपा खासदार वरूण गांधी यांच्यानंतर आणखी एका भाजपा नेत्यानं या प्रकरणावरून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यावर तोफ डागलीय.

लखीमपूर हिंसाचार घडला, तेव्हा कुठे होतास? एसआयटीच्या प्रश्नावर आशीष मिश्रा म्हणतो, “मी तर तेव्हा…!”

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर हत्याकांडप्रकरणी दोन समन्स पाठवल्यानंतर अखेर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आरोपी आशीष मिश्रा पोलिसांसमोर हजर…

Latest News
supreme court verdict evm vvpat
EVM बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल; विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या; न्यायमूर्ती म्हणाले…

ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांचा वापर करावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने निकाल दिला आहे.

Only 7.23 polling till 9 am in Yavatmal-Washim
यवतमाळ-वाशिममध्ये सकाळी नऊपर्यंत केवळ ७.२३ मतदान, समर्थकांमध्ये धाकधूक

यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.२३% इतके मतदान झाले होते.

thane air quality marathi news, thane air quality index marathi news,
ठाण्याची हवा समाधानकारक, हवेचा गुणवत्ता निर्देशांक ६५ ते ८५ च्या आत

गेल्यावर्षी दिवाळीच्या काही दिवस आधी मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरातील हवेच्या गुणवत्तेचा स्तर खालावला होता.

Heart Attack Shocking Video
भयानक घटना! भाच्याच्या लग्नात आनंदाने नाचत होता मामा; पण पुढच्याच क्षणी कोसळला अन्…थरारक VIDEO पाहून फुटेल घाम

Viral video: भाच्याच्या लग्नात आनंदाने नाचत होता मामा; पण पुढच्याच क्षणी कोसळला अन्…

Anil Deshmukh Sunil Kedar and Abhijit Vanjari Hastily Deported From Wardha District
अनिल देशमुख, सुनील केदार, अभिजित वंजारी वर्धा जिल्ह्यातून तडकाफडकी हद्दपार, जाणून घ्या कारण…

अनिल देशमुख, माजी पालकमंत्री सुनील केदार तसेच आमदार अभिजित वंजारी हे तीन बडे नेते १५ दिवसांपासून मुक्कामी होते.

विराटकडून मागितलेली 'ती' खास वस्तू अखेर रिंकू सिंहला मिळाली
VIDEO : ‘जिद्दी’ रिंकू सिंहच्या प्रयत्नांना यश, विराट कोहलीकडून मागितलेली ‘ती’ खास वस्तू अखेर मिळाली

Rinku Singh Virat Kohli: विराटकडून ती खास गोष्ट मिळाल्यानंतरचा आनंद रिंकूच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. याचा एक व्हिडीओ केकेआरने एक्सवर…

Groom cast vote before going for marriage
वाशीम : नवरदेवाने बोलल्यावर चढण्याआधी बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणूकही २६ एप्रिल रोजी आल्याने मडके परिवारातील नवरदेव अतुल संतोष मडके बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचा हक्क बाजावला.

Amravati Lok Sabha Constituency man done voting before wedding at amravati
अमरावती : आधी मतदान; मग वऱ्हाड घेऊन नवरदेव रवाना…

अमरावतीच्या वडरपुरा परिसरातील नवरदेव लग्नासाठी वऱ्हाड घेऊन वर्धा येथे जाण्यापूर्वी मतदान केंद्रावर पोहोचून त्याने मतदानाचा हक्क बजावला.

Woman attends online meeting on scooter amid traffic jam Watch
Work-Life Balance, ते काय असतं? इथे भर रस्त्यात स्कूटर चालवत तरुणीची मोबाईलवर सुरु आहे ऑफिस मिटिंग, पाहा Video

ट्रॅफिकमध्ये स्कुटर चालवतानाही तरुणीचा ऑफिस मिटिंगमध्ये सहभाग; Viral Video पाहून नेटकरी म्हणे,”Work from Traffic!”

संबंधित बातम्या