Waqf Amendment Bill : अल्पसंख्याक मंत्री किरेण रिजिजू यांनी वक्फ अमेंडमेंट बिल आज लोकसभेत सादर केलं. या विधेयकाला विरोधी पक्षातील खासदारांचा कडाडून विरोध होतो आहे. अशा प्रकारचं विधेयक सरकारला का आणायचं आहे? असा प्रश्न विरोधी पक्षातील खासदारांनी उपस्थित केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी या विधेयकाचं समर्थन केलं आहे. या विधेयकावर ( Waqf Amendment Bill) लोकसभेत चर्चा सुरु झाली आहे. त्यादरम्यान एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकार मुस्लिम विरोधी आहे अशी टीका केली आहे.

वक्फ बोर्डाच्या विधेयकात काय काय तरतुदी आहेत?

विधेयकाचा उद्देश गरीब मुस्लिमांना न्याय देणं आणि मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क प्रदान करणं हा आहे.

Eknath Shinde, reservation,
Eknath Shinde : आरक्षण रद्द करणाऱ्यांविरोधात आम्ही उभे राहू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
amit shah rahul gandhi
Amit Shah Targets Rahul Gandhi: “मी राहुल गांधींना सांगू इच्छितो की जोपर्यंत…”, अमित शाह यांची लोकसभा विरोधी पक्षनेत्यांवर टीका; म्हणाले, “देशविरोधी…”
TMC MP Jawhar Sircar
TMC MP Jawhar Sircar : तृणमूल काँग्रेस अन् खासदारकीचा राजीनामा देण्याचं कारण काय? जवाहर सरकार यांनी केलं मोठं भाष्य
bjp haryana
हरियाणात भाजपाची वाट बिकट, उमेदवार यादी जाहीर होताच पक्षातील नेत्यांचे राजीनामे; काँग्रेस मारणार बाजी?
Mohan Bhagwat News
Mohan Bhagwat : “देवत्व लोकांनी ठरवावं”, मोहन भागवतांचा इशारा मोदींना तर नाही ना?
Kangana Ranaut farmers protest remarks
MP Kangana Ranaut: भाजपाने खासदार कंगना रणौत यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्यापासून फारकत का घेतली?
Rahul Gandhi oppose lateral entry in upsc
रालोआ घटकपक्षांचा ‘थेट भरती’ला विरोध; जेडीयू, एलजेपीचा वेगळा सूर

रेल्वे मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यानंतर देशातील मालमत्तांच्या बाबत वक्फ बोर्डाचा ( Waqf Amendment Bill) तिसरा क्रमांक लागतो.

देशात ३० वक्फ बोर्ड आहेत ज्यांच्याकडे ८ लाख एकरहून अधिक मालमत्ता आहेत.

दुरुस्ती विधेयकात केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्ड यांचं संलग्नीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. ज्यामुळे मुस्लिम महिलांना आणि बिगर मुस्लिमांनाही प्रतिनिधित्व मिळेल

विधेयकातील तरतुदीनुसार वक्फ बोर्डाला त्यांच्या मालमत्तांमधून जे उत्पन्न मिळतं ते देणगीसाठी खर्च करावं लागणार आहे.

विधेयकात असाही प्रस्ताव आहे की जिल्हाधिकारी हे ठरवतील की कुठली मालमत्ता वक्फ बोर्डाची आहे ? ती जर सरकारी जमीन असेल तर त्यावर वक्फ बोर्डाचा हक्क नसेल.

बोहरा आणि आगाखान मुस्लिम यांच्यासाठी औकाफ बोर्ड तयार करण्यात यावं असाही प्रस्ताव विधेयकात आहे.

हे पण वाचा- Waqf Amendment Bill : लोकसभेत वक्फ बोर्डासंबंधीचं विधेयक सादर, विरोधी पक्षाने घेतला जोरदार आक्षेप, हा तर संविधानावरचा हल्ला म्हणत टीका

सरकारवर विरोधी पक्षांची टीका

सरकार हे बिल ( Waqf Amendment Bill) आणून यंत्रणेची हत्या करतं आहे. तुम्ही हिंदू आणि मुस्लिम यांचं विभाजन पुन्हा करत आहेत. अशी टीका खासदार मोहम्मद बशीर यांनी केली. तर हे विधेयक म्हणजे सरकारने रचलेला एक कट आहे असा गंभीर आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. वक्फ बोर्डात ( Waqf Amendment Bill) बिगर मुस्लिमांना का आणायचं आहे? त्याने काय साध्य होणार आहे? असा प्रश्न अखिलेश यादव यांनी विचारला आहे. दुसरीकडे असदुद्दीन ओवैसी यांनी सरकार मुस्लिम विरोधी असल्याचीही टीका केली आहे.

Asaduddin Owaisi
असदुद्दीन ओवेसी मुस्लीम पंतप्रधानाबाबत काय म्हणाले?

काय म्हणाले असदुद्दीन ओवैसी?

“असुद्दीन ओवैसी म्हणाले नियम ७२ (२) प्रमाणे मी या दुरुस्ती विधेयकाचा ( Waqf Amendment Bill ) कडाडून विरोध करतो. हिंदू सगळी संपत्ती मुलाच्या किंवा मुलीच्या नावे करु शकतात पण आम्ही एक तृतीयांश संपत्तीच देऊ शकतो अशी तरतूद का? हिंदू संघटना आणि गुरुद्वारा संचालक समितीत बिगर हिंदू किंवा बिगर शिख धर्माचे लोक नसतात. मग वक्फ बोर्डात बिगर मुस्लिम लोकांचा समावेश कशासाठी केला जातो आहे? हे दुरुस्ती विधेयक हिंदू आणि मुस्लिम यांच्यात भेद पसवरण्याचं त्यांना एकमेकांपासून तोडण्याचं काम करणारं आहे. वक्फ बोर्ड (Waqf Amendment Bill) ही काही पब्लिक प्रॉपर्टी नाही. सरकारला दर्ग्यांकडे असलेली मालमत्ता ( Waqf Amendment Bill) हडप करायची आहे. तुम्ही मुस्लिम महिलांच्या हक्कांची गोष्ट करत आहात. तुम्ही बिल्कीस बानो आणि जाकिया जाफरी यांना सदस्य करुन घ्याल ना? तुम्ही देश तोडण्याचं काम करत आहात. याचं कारण मोदी सरकार हे मुस्लिम विरोधी आहे.” अशी बोचरी टीका असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.