पंजाब किंग्जचा तडाखेबंद फलंदाज आशुतोष शर्माने पुन्हा एकदा तुफानी खेळी करत चाहत्यांची मने जिंकली. आशुतोषने कठीण परिस्थितीत पंजाबसाठी केवळ २३ चेंडूत स्फोटक अर्धशतक झळकावले. या सामन्यात सर्वांच लक्ष वेधून घेणारा क्षण म्हणजे आशुतोष शर्माने बुमराहच्या चेंडूवर लगावलेला षटकार. आशुतोषने बुमराहच्या चेंडूवर लॅप शॉट खेळून सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र, आशुतोष शर्मा पंजाबला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.

१३व्या षटकात जसप्रीत बुमराह त्याचे तिसरे षटक टाकत होता. या षटकात त्याने आशुतोष शर्माला एक चेंडू नो-बॉल टाकला. याचा फायदा घेत आशुतोषने स्वीप शॉट मोठ्या सहजतेने मारत अप्रतिम षटकार लगावला. आशुतोषचा हा षटकार पाहून डगआऊटमध्ये बसलेला सूर्यकुमारही थक्क झाला. जगातील नंबर वन गोलंदाजासमोर न डगमगता आशुतोषने थेट षटकार लगावल्याने सगळेच चकित झाले. तर बुमराहसारख्या गोलंदाजाला लगावलेला षटकार पाहून आशुतोषचाही आनंद गगनात मावेनासा झाला.

IND vs BAN Rohit Sharma interacts with R Ashwin Daughters
IND vs BAN : विजयानंतर रोहित शर्माने पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मनं, अश्विनच्या मुलींशी बोलतानाचा VIDEO व्हायरल
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
EY Employee Death News
EY Employee Death : “मॅनेजर क्रिकेटच्या सामन्यानुसार कामाचं वेळापत्रक बदलायचे, म्हणून…”, ॲनाच्या वडिलांचा गंभीर आरोप
Rohit Sharma Became First Captain to Complete 1000 Runs in 2024 IND vs BAN 1st Test
IND vs BAN: रोहित शर्माने चेन्नई कसोटीत केला मोठा पराक्रम; २०२४ मध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला कर्णधार
IND vs BAN Sanjay Manjrekar on Virat Kohli DRS Blunder
IND vs BAN : ‘आज विराटसाठी वाईट वाटलं…’, कोहलीच्या DRS न घेण्यावर संजय मांजरेकरांचं वक्तव्य; म्हणाले, ‘त्याने संघासाठी…’
IND vs BAN Rohit Sharma got trolled on social media
IND vs BAN : ‘चुकीच्या प्रकारातून निवृत्त झालास…’, चेन्नई कसोटीत अपयशी ठरल्यावर रोहित शर्मा होतोय ट्रोल
IND vs BAN 1st Test Mahmud Hasan no wicket celebration
IND vs BAN : ‘रोहित-विराट’ला बाद करूनही महमूद हसन असंतुष्ट! काय आहे कारण?
IND vs BAN Rohit Sharma praises Rishabh Pant
IND vs BAN : ऋषभ पंतने स्फोटक खेळीने जिंकले कर्णधाराचे मन, रोहित शर्मा कौतुक करतानाचा VIDEO व्हायरल

आशुतोषने सामन्यानंतर बुमराहला लगावलेल्या षटकारावर आपली प्रतिक्रिया देताना म्हणाला, “जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर स्वीप शॉट मारणे हे माझे स्वप्न होते. मी अशा स्वीप शॉट्सचा खूप सराव केला आहे. संघाला विजय मिळवून देऊ शकेन असा विश्वास होता.”

याशिवाय पंजाब किंग्जचा फलंदाज आशुतोषने आकाश मढवालविरुद्ध शानदार शॉट खेळला ज्यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित सर्वजण थक्क झाले. आशुतोषच्या दोन्ही षटकारांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसऱ्यांदा, १६व्या षटकात आकाश मढवाल गोलंदाजीसाठी आला तेव्हा चौथा चेंडू नो बॉल होता, ज्यावर आशुतोषने षटकार खेचून झंझावाती अर्धशतक पूर्ण केले. पुढच्याच चेंडूवर आशुतोषने रिव्हर्स स्वीप करत शानदार षटकार ठोकला. मढवालच्या चेंडूवर आशुतोषने शानदार शैलीत बॅट फिरवली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला.