पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटातील घरांसाठी गेल्या महिन्यात लॉटरी जाहीर केली होती. मात्र, नागरिकांच्या मागणीनुसार म्हाडाने नागरिकांना घरांसाठी अर्ज करण्याला मुदतवाढ दिली आहे. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांची संख्या १०० ने वाढविली आहे.

गेल्या महिन्यात ८ मार्चपासून या लॉटरीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली. ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत ८ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. आता ३० मे रोजी रात्री ११:५९ पर्यंत नागरिकांना घरांसाठी अर्ज करता येणार आहेत. म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी प्रथम http://www.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, तर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन म्हाडा पुणे मंडळाकडून करण्यात आले.

pune medical treatment marathi news
आतड्याला पीळ पडलेल्या चिमुरड्याला जीवदान! मिडगट व्हॉल्वुलस विकारावर यशस्वी उपचार
credai pune marathi news, credai training to engineering students marathi news
भावी अभियंते गिरवणार आता अनुभवातून धडे! दोनशे तास प्रत्यक्ष कामाची मिळणार संधी
pimpri chinchwad crime news, pimpri chinchwad vitthal ludekar marathi news
पिंपरी: कोयत्याचा धाक, गुंडगिरी करणारा तडीपार; इतर दोघांवर मोक्काअंतर्गत कारवाई; चिखली पोलिसांची कामगिरी
Abki Bar Srirang Barane khasdar Srirang Barane himself gave his own announcements
…अन् अबकी बार श्रीरंग बारणे खासदार; बारणेंवर स्वतःच घोषणा करण्याची आली वेळ! चर्चेला उधाण

हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्टफार्म प्रणाली’… कशी ठरणार उपयुक्त?

सोडतीचा तपशील योजना आणि सदनिका याप्रमाणे

  • म्हाडा योजनेंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य – २४१६
  • म्हाडाच्या विविध योजना – १८
  • म्हाडा पंतप्रधान आवास (पीएमएवाय) योजना – ५९
  • पंतप्रधान आवास (पीएमएवाय) खासगी भागीदारी योजना (पीपीपी) – ९७८
  • २० टक्के योजना पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड १४०६

एकूण ४८७७ सदनिका