लोकसत्ता टीम

नागपूर : उपराजधानीसह संपूर्ण विदर्भातच नाही तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने ठाण मांडले आहे. वादळीवारा आणि गारपीटीसह होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आज पुन्हा राज्याच्या अनेक भागात पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. राज्याच्या काही भागात “रेड अलर्ट” तर काही भागात “ऑरेंज अलर्ट” दिला आहे.

Ajit Pawar on Vijay Shivtare Question Marathi News
Ajit Pawar: “तुम्ही मला मूर्ख समजू नका, मी…”, अजित पवार ‘त्या’ प्रश्नावर भडकले; विजय शिवतारेंबाबत मांडली भूमिका!
Lok Sabha elections, physical test,
लोकसभा निवडणुकीमुळे ‘पीएसआय’च्या शारीरिक चाचणी लांबणीवर; एमपीएससीचा निर्णय
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत

गेले दोन दिवस वादळीवारा आणि गारपीटीसह झालेल्या पावसामुळे अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात धान उत्पादक शेतकरी आणि फळबागाधारक शेतकरी यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशातच आता हवामान खात्याने अकोला, वाशिम आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांना “रेड अलर्ट” दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तसेच हवामान खात्याने या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचाही इशारा दिला आहे. याशिवाय बुलडाणा, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्येही आज “ऑरेंज अलर्ट” देण्यात आलेला आहे. इथेही वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील उर्वरित जिल्हे, संपूर्ण मराठवाडा, नगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा “येलो अलर्ट” देण्यात आला आहे.

आणखी वाचा-अमित शहांचा आदेश पाण्यात, भाजप उमेदवाराची शहरात दोन कार्यालये

हवामान खात्याने यापूर्वी दिलेल्या इशाऱ्यात राज्यात नऊ एप्रिल पर्यंतच पाऊस होता. मात्र, आता पुन्हा एकदा १३ एप्रिल पर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात १० ते १३ एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यादरम्यान राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानात घट झाली आहे. तीन दिवसांपूर्वीपर्यंत विदर्भात कमाल तापमानाने ४२ अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक तापमानाची नोंद केली होती. हा पारा वाढतच जाणार असे वाटत असताना अवकाळी पावसामुळे तो ४० अंश सेल्सिअसच्याही खाली गेला आहे. राज्याच्या इतर भागात म्हणजेच पुण्यातही १५ व १७६ एप्रिल असा दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर मुंबई आणि कोकणात मात्र वातावरण कोरडे राहील, असा अंदाज आहे. राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये ढगाळ हवामानाचे सावट असून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.