News Flash

बाजार-साप्ताहिकी : दुप्पट सावधगिरी

निदान काही काळ सामान्य गुंतवणूकदारांनी बाजारापासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक वाटते.   

सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

कुठल्याही नकारात्मक बाबींची दखल  न घेता बाजार जेव्हा एकाच दिशेने प्रवास करतो तेव्हा नेहमीच्या तुलनेत दुप्पट सावाधानता बाळगणे गरजेचे असते.

आर्थिक वृद्धी आणि विवेकाधीन वस्तूंच्या खपातील सकारात्मकतेमुळे अमेरिकी निर्देशांक सलग तिसऱ्या सत्रात विक्रमी पातळीवर बंद झाले. तिसऱ्या तिमाहीच्या जीडीपीच्या सुधारित अंदाजानुसार, अमेरिकेची अर्थव्यवस्था पूर्वअनुमानित १.९ टक्क्यांच्या तुलनेत २.१० टक्के वाढ नोंदविण्याच्या अपेक्षेने अमेरिकी भांडवली बाजाराने उसळी घेतली. त्याचे पडसाद भारतीय भांडवली बाजारात जरी उमटले, तरी मागील आठवडय़ात गुंतवणुकीत सावधानता बाळगण्याचा दिलेला सल्ला किती योग्य होता हे शेवटच्या दिवशी झालेल्या मोठय़ा घसरणीने दाखवून दिले. येत्या आठवडय़ात सावधानता अधिक कसोशीने पाळावी अशी परिस्थिती आहे. बाजार जितका वर जाईल तितकी नवीन गुंतवणूक करणे अधिक धोकादायक बनेल. अमेरिका आणि चीन यांच्या व्यापार युद्धात तह होण्याच्या अपेक्षेने बाजाराने सकारात्मकता नोंदवत निर्देशांकांनी आठवडय़ाच्या पूर्वार्धात नवीन शिखरे काबीज केली. रिलायन्सने ऑगस्टमध्ये ८ लाख कोटीचा बाजार भांडवली टप्पा गाठला, ऑक्टोबर महिन्यात ९ लाख कोटीचा बाजार भांडवलाचा टप्पा पार करत, त्यानंतर केवळ कामकाजाच्या २७ सत्रात १० लाखकोटींचा टप्पा पार केला. कुठल्याही नकारात्मक बाबींची दखल न घेता बाजार जेव्हा एकच दिशेने प्रवास करतो तेव्हा नेहमीच्या तुलनेत दुप्पट सावधानता बाळगणे गरजेचे असते. पाचपैकी तीन सत्रात वाढ नोंदवत सप्ताहअखेर निर्देशांकात – सेन्सेक्समध्ये ४३५, तर निफ्टीमध्ये १४१ अंशांची साप्ताहिक वाढ झाली.

गुरुवारी झालेल्या वायदापूर्तीत इंडेक्स फ्युचरमध्ये ऑक्टोबर महिन्यातील निफ्टीच्या ७० टक्क्य़ांच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यांत ७९ टक्के वायद्यांची डिसेंबर महिन्यात खरेदी कायम राहिली. स्टॉक फ्युचर्सचा विचार करता सर्वाधिक रोल ओव्हर आयसीआयसीआय बँकेत दिसून आले. नोव्हेंबरच्या सौदापूर्तीत मागील तीन महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक रोल ओव्हर झाल्याचे आकडेवारी दर्शवत आहे. जेव्हा वाढलेल्या किमतीत अधिक रोलओव्हर होतात तेव्हा बाजाराचा प्रवास अधिक धोकादायक असतो. निदान काही काळ सामान्य गुंतवणूकदारांनी बाजारापासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक वाटते.

आर्थिक दरवाढीचा वेग पाच टक्क्यांहून खाली येण्याचा अंदाज तसेच नफावसुलीच्या दबावामुळे शुक्रवारी बाजार मोठय़ा फरकाने खाली आला. बाजार पुढील आठवडय़ात प्रत्यक्ष जाहीर झालेल्या आर्थिक आकडेवारीवर प्रतिक्रिया देईल तसेच नोव्हेंबर महिन्याच्या वस्तू व सेवा कर संकलनाच्या आणि वाहन खरेदीच्या आकडय़ांवर बाजार प्रतिक्रिया देईल.

l

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 2:41 am

Web Title: analysis of indian stock market weekly analysis of stock market zws 70
Next Stories
1 विकासदराचा नीचांक ; अर्थगती ४.५ टक्क्यांवर
2 १५० देशांच्या जीडीपीपेक्षाही मोठी आहे मुकेश अंबानींची रिलायन्स
3 अर्थवृद्धीतील मरगळ पाच टक्क्य़ांखालील तळाकडे!
Just Now!
X