गेल्या दशकभरात म्युच्युअल फंड उद्योग आणि गुंतवणूकदार समाजाचा आवाज बनलेला, भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआयचा वार्षकि उपक्रम ‘म्युच्युअल फंड समिट’चे यंदाचे ११ वे वर्ष असून, ते येत्या ३० जून रोजी हॉटेल ललित, अंधेरी येथे यूटीआय अ‍ॅसेट मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक लिओ पुरी यांच्या अध्यक्षतेखाली भरवले जाणार आहे. सेबीचे अध्यक्ष यू के सिन्हा हे परिषदेचे प्रमुख पाहुणे असतील. परिषदेनिमित्ताने फंड उद्योगातील वितरक व उत्पादक एकत्र येतात आणि त्यांची मतभिन्नता बाजूला ठेवून त्यांचा अनुभव व विकासाची कहाणी कथन करतात. गेल्या वर्षभरात म्युच्युअल फंडांमध्ये वाढलेला गुंतवणूक ओघ आणि व्याप्तीतील विकास, ही यंदाच्या समिटला लाभलेली महत्त्वाची पाश्र्वभूमी असून, हा विकास आणखी दृढ करण्यासाठी सकारात्मक भावना वाढीस लावण्याची, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची आणि वितरण माध्यमांत वैविध्य आणणे हा परिषदेचा मुख्य अजेंडा राहील.