25 September 2020

News Flash

स्वयंपाकाच्या गॅसपाठोपाठ सीएनजी, पीएनजीही महाग

स्वयंपाकाच्या गॅसपाठोपाठ नळाद्वारे होणाऱ्या वायुपुरवठय़ाचे (पीएनजी) दरही वाढले आहेत. मुंबई शहरात महानगर गॅस लिमिटेडतर्फे वितरण होत असलेल्या पीएनजी तसेच वाहनांसाठीचे वायूदरही (सीएनजी) शुक्रवार मध्यरात्रीपासून वाढविण्यात

| November 1, 2014 01:24 am

स्वयंपाकाच्या गॅसपाठोपाठ नळाद्वारे होणाऱ्या वायुपुरवठय़ाचे (पीएनजी) दरही वाढले आहेत. मुंबई शहरात महानगर गॅस लिमिटेडतर्फे वितरण होत असलेल्या पीएनजी तसेच वाहनांसाठीचे वायूदरही (सीएनजी) शुक्रवार मध्यरात्रीपासून वाढविण्यात आले आहेत.
मुंबईत सीएनजी प्रति किलो ४.५० रुपये तर पीएनजी २.४९ प्रति एससीएम (स्टॅण्डर्ड क्युबिक मीटर) रुपयांनी वधारले आहे. संबंधित वजनासाठी मुंबईकरांना सीएनजीपोटी आता ४३.४५ रुपये तर पीएनजीसाठी २६.५८ e05रुपये मोजावे लागतील.
केंद्र सरकारने देशांतर्गत नैसर्गिक वायुचे दर ४.२० डॉलर प्रति दशलक्ष ब्रिटिश औष्णिक एककवरून ५.६१ डॉलर प्रति दशलक्ष ब्रिटिश औष्णिक एकक (एमएमबीटीयू) केल्यामुळे स्वयंपाक तसेच वाहनांसाठीचे दर वाढविणे अपरिहार्य असल्याचे महानगर गॅस लिमिटेडने म्हटले आहे. शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत वाढीव वायू दर हे अनुक्रमे ६० व ३२ टक्क्यांनी स्वस्तच असल्याचा दावाही कंपनीने केला आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कर आदी धरून सीएनजीचे दर ४३.४५ ते ४४.७० रुपये प्रति किलो दरम्यान असतील. तर पीएनजीचे दर २६.५८ ते २७.०० रुपये व २९.२६ ते २९.६८ एससीएम असे दोन टप्प्यांत असतील. पीएनजीसाठी कंपनीने तिसऱ्या टप्प्याची रचना कायम ठेवतानाच पहिला टप्पा ०.० ते १.२ एससीएमडी (आधीचा ०.० ते ०.५०) व दुसरा टप्पा १.२ ते २.०० एससीएमडी (आधीचा ०.५० ते ०.९०) असा अद्ययावत केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2014 1:24 am

Web Title: cng png prices hike
टॅग Cng
Next Stories
1 बँक-सज्जतेचा ओझ्याने ‘आयडीएफसी’च्या नफ्याला कात्री
2 नोकियाचा चेन्नई प्रकल्प आजपासून बंद
3 मालमत्ता विक्रीच्या वाटाघाटीच्या सुविधेसाठी तुरुंग प्रशासनाला ३१ लाख मोजले
Just Now!
X