सर्वोत्तम, वास्तववादी आणि उत्तम चालणाऱ्या स्टार्टअपच्या पहिल्यावहिल्या मालिकेचे, ग्रीनरूमचे उद्घाटन होत असून बंगळुरू येथे ते शनिवारी होत आहे. ग्रीनरूम हे महत्त्वाकांक्षी उद्योजकांसाठीचे एक अनोखे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्टार्टअपला पाठिंबा देऊन आणि खऱ्या अर्थयंत्रणेची निर्मिती करून त्यांच्या विकास आणि यश व्हावा, यासाठी फेडरल बँक उत्सुक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विचारवंत, भविष्याकाळाचा वेध घेणारे विचारवंत आणि कार्यरत असणारे अशा महत्त्वपूर्ण लोकांचा समावेश असेल. तसेच स्टार्टअप, गुंतवणूकदार, गुंतवणूकदार बँका, कॉर्पोरेट्स, एसएमइ सेवा पुरवठादार, नेतृत्व करणारे, माहिती तंत्रज्ञान संस्था इत्यादींचाही समावेश आहे.

खासदार डॉ. शशी थरूर हे या कार्यRमाचे प्रमुख पाहुणे असतील. फेडरल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम श्रीनिवासन् हे कार्यक्रमात उपस्थित असतील.

 

सोलापूरच्या लघु उद्योजिकेला जॅकपॉट

मुंबई : भारतीय ऑनलाइन गेमिंग उद्योगातील अग्रेसर प्लेविनने सोलापूरच्या लघु उद्योजिका स्वाती सतिश जाधव या २.१९ कोटी रुपयांच्या ‘जॅकपॉट’ विजेत्यांचा नुकताच गौरव केला. पॅन इंडिया नेटवर्क लिमिटेडचे सागर सुळे हे यावेळी उपस्थित होते.

क्लिअरटॅक्सचे व्यापाऱ्यांसाठी व्यासपीठ

मुंबई : क्लिअरटॅक्स या आघाडीच्या प्राप्तीकर परतावे ई फायलिंग संकेतस्थळाने व्यापाऱ्यांकरिता खास सुविधा उपलब्ध केली आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तंत्रज्ञानयुक्त सेल्फ  ई फायलिंग क्लिअरटॅक्स मंचावर विविध सेवा दिल्या जाणार आहेत. व्यापार गटामध्ये प्राप्तीकर परताव्याशी संबंधित माहिती तसेच सेवा संबंधित उणीव दूर करणे हे क्लिअरटॅक्सने नुकत्याच सादर केलेल्या सुविधेचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या सुविधेविषयी क्लिअरटॅक्स.कॉमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चित गुप्ता यांनी सांगितले की, व्यापारी प्राप्तीकर परतावे इतर पगारदार व्यावसायिकांपेक्षा वेगळे असतात; कारण त्यांना मिळणारे उत्पन्न व्यावसायिक उत्पन्न म्हणून धरले जावे यासाठी आयटीआर १, २ किंवा २ए ऐवजी आयटीआर ४ भरावा लागतो. यामुळे त्यांना भांडवली व्यवहार हे काम असल्याचे दाखवून व्यवसायात येणारा खर्च हा कर वजावट म्हणून सादर करता येतो. आम्ही सादर केलेल्या विशेष व्यासपीठाच्या सहाय्याने प्राप्तीकर परताव्यासाठी प्रक्रिया करणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्यातील सुविधा व आमच्या चमूचे कौशल्य यांचे कौतुक केले आहे. या विश्वासामुळेच क्लिअरटॅक्सद्वारे व्यापार परतावे भरण्यात गेल्या काही दिवसांमध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचेही ते म्हणाले.

फार्मईझीचे १० पट मनुष्यबळ विस्ताराचे लक्ष्य

मुंबई : स्थानिक औषध विक्रेत्यांना ग्राहकांशी थेट जोडणारा भारतातील  आघाडीच्या फार्मईझीने रुग्णांना अधिक सुविधा प्रदान करण्याच्या आणि औषधे प्राप्त करण्याची प्रक्रिया त्रासमुक्त करण्याच्या हेतूसह पुढील सहा महिन्यांमध्ये मनुष्यबळ विस्तार करण्याचे नियोजन केले आहे. फार्मईजी कंपनी त्यांची सध्याची २०० कर्मचारी क्षमता या कालावधीमध्ये दुपटीहून अधिक करत ५०० पर्यंत नेण्याचा मानस व्यक्त केला आहे. ही संख्या पुढील दोन वर्षांमध्ये १० पट वाढिवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.  कंपनीच्या कार्यरत योजनांबाबत फार्मईजीचे सह संस्थापक धर्मिल सेठ  यांनी सांगितले की, आरोग्यनिगा हे जगातील सर्वात मोठे बहुपयोगी क्षेत्र आहे. आरोग्यविषयक आजारांनी पिडीत लोकांची संख्यासुद्धा येथे अधिक आहे. त्यामुळेच भारतात औषधे वापराचे प्रमाण अत्यंत अधिक आहे. आरोग्य सेवेशी संयोजित औषधे सकल राष्ट्रीय उत्पादनात ५ ते १० टक्यांहून अधिक योगदान राखतात. ऑनलाईन पद्धतीने औषधे खरेदी करण्याकरिता ग्राहकांच्या वाढत्या मागणीने फार्मईजीच्या विकासाला चालना देण्यामध्ये सहाय्य प्रदान केले आहे. याच वाढत्या मागणीने आमची क्षमता विस्तारित करण्याकरिता आणि ग्राहकांना सर्वोत्तम सेवा प्रदान करण्याद्वारे त्यांचे समाधान वर्धित करण्याकरिता प्रेरित केले, असे सेठ यांनी सांगितले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Economy news
First published on: 22-09-2016 at 01:26 IST