News Flash

म्युच्युअल फंडांच्या कामगिरीचे मूल्यमापन

पोर्टफोलिओतील समभागांची निवड आणि गुंतवणुकीचे निर्णय घेणारा फंड व्यवस्थापक हा महत्त्वाचा घटक आहे.

अखिल चतुर्वेदी

मुच्युअल फंडात गुंतवणुकीच्या सुरुवातीपासूनच जोखीम असते आणि ती थेट गुंतवणूकदारांशी संबंधित असते. परंतु मुच्युअल फंडाची कामगिरी त्या फंडाने दिलेल्या परताव्याच्या आकडेवारीनुसार बहुतांशदा ठरविली जाते. प्रत्यक्ष जोखीम आणि परतावा यांचा थेट संबंध असल्याने मुच्युअल फंडात गुंतवणूकीची संधी मिळते आणि जोखीम किमान पातळीवर ग्रा धरम्त जास्त परताव्यावर भर दिला जातो.

आघाडीच्या फंडाशी तुलनात्मक कामगिरी

एकाच विशिष्ट गटातील अन्य फंडांच्या कामगिरीशी तुलनात्मक मुल्यमापन हेदेखील एक उपयोगी संदर्भरेषा म्हणता येईल. मुच्युअल फंड हे त्यांच्या गटात अग्रस्थानी राहण्यासाठी नेहमीच स्पर्धा करतात. निश्चित केलेल्या कालावधीत ठरविलेल्या परताव्याचा हेतू अथवा उद्दीष्टामुळे अन्य आघाडीच्या फंडांशी सतत तुलना करणे योग्य असते आणि ती करण्याची शिफारस केली जाते.

जोखीमशी निगडीत परतावा

विशिष्ट कालावधीदरम्यान गृहीत धरलेल्या जोखीमेशी तुलना करत निश्चित केलेला परतावा म्हणजे जोखीमेशी निगडीत परतावा होय. कमी जोखीम असलेल्या फंडासाठी असा परतावा अधिक धरला जातो. तर इतर फंडासाठी याच कालावधीतील परतावा हा जोखीमेइतकाच असतो. नेहमीच्या प्रमाणित मुल्यमापनाच्या तुलनेत ‘बेंचमार्कींग’च्या आधारे फंडाची गुणवत्ता ठरविली जाते. फंड बाजाराच्या तुलनेत हा घटक म्हणजे संदर्भपातळी होय. फंडातील गुंतवणुकीमागे काहीही उद्दीष्ट असले तरी बाजारातील स्पर्धेच्या तुलनेत गुंतवणूकदाराला आपल्या गुंतवणुकीच्या कामगिरीचे मुल्यमापन या घटकाआधारे करता येते.

बाजारातील सद्यस्थितीची भुतकाळातील परताव्याशी तुलना करत गुंतवणूकदाराला आपल्या गुंतवणुकीच्या मुल्यमापनासाठी संदर्भपातळी ठरविता येते. परंतु भूतकाळातील आकडे भविष्यकाळातील अंदाज ठरविण्यासाठी विश्वासार्ह घटक नाही, हेही तेवढेच खरम्े आहे.

पोर्टफोलिओतील समभागांची गुणवत्ता

विशिष्ट कालावधीसाठी गुंतवलेल्या भांडवलावर मिळणारा परतावा हा आपल्या पोर्टफोलिओतील समभागांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. किंबुहना परतावा हा गुणवत्तेचे प्रतिबिंब होय. त्यामुळे फंडाची बाजारपेठेतील क्रमवारी सतत तपासणे अतिशय व्यवहार्य आहे. आपल्या पोर्टफोलिओतील समभागांच्या गुणवत्तेआधारेच परतावा मिळेल. म्हणूनच गुणवत्ता आणि ऐतिहासिक कामगिरीआधारेही आपल्या फंडाच्या कामगिरीचे मुल्यमापन करता येते.

एकूण कामगिरी आणि फंड व्यवस्थापकाची कार्यक्षमता

पोर्टफोलिओतील समभागांची निवड आणि गुंतवणुकीचे निर्णय घेणारा फंड व्यवस्थापक हा महत्त्वाचा घटक आहे. फंड व्यवस्थापकाची समज आणि क्षमता गुंतवणूकदाराने जाणून घेतली पाहिजे. त्याची भुतकाळातील कामगिरी हासुध्दा महत्त्वाचा घटक असून तो गुंतवणुकीसाठी मोलाचा आधार आहे.

(लेखक मोतीलाल ओसवाल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे विक्री व विपणन विभागाचे प्रमुख आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 4:43 am

Web Title: evaluating the performance of mutual funds zws 70
Next Stories
1 ब्रिटनची थॉमस कुक दिवाळखोरीत!
2 गुरुवारपासूनचा दोन दिवसीय बँक संप रद्द
3 उद्योगजगतातून ‘आली दिवाळी’चा हर्षभरीत सूर
Just Now!
X