भांडवली बाजारातील निर्देशांक घसरण आठवडय़ातील सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. सत्रात सोमवार बंद तुलनेत ७०० अंशांनी झेप घेणारा सेन्सेक्स मंगळवारअखेर मात्र घसरला.

मुंबई निर्देशांक १९०.१० अंश घसरणीसह ३१,३७१.१२ पर्यंत खाली आला, तर निफ्टीत ४२.६५ अंश घसरण होऊन प्रमुख निर्देशांक ९,१९६.१२ वर स्थिरावला.

करोना संकट अधिक गहिरे होण्याबाबत आंतरराष्ट््ररीय स्तरावर व्यक्त केल्या गेलेल्या चिंतेचे सावट येथेही उमटले. भारतात सरकारच्या वतीने अर्थसाहाय्य जाहीर होण्याच्या आशेने दुपारच्या सत्रात निर्देशांक उसळी अनुभवली गेली.

सेन्सेक्समध्ये रिलायन्स ६ टक्क्यांसह आपटला, तर ऊर्जा निर्देशांकाला सर्वाधिक फटका बसला.